|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्नी न्यायालयीन लढाईसह जनआंदोलनही आवश्यक

सीमाप्रश्नी न्यायालयीन लढाईसह जनआंदोलनही आवश्यक 

वार्ताहर/ किणये

सीमाप्रश्नाच्या खटल्याची न्यायालयीन लढाई सुरू असताना जनआंदोलने ही झालीच पाहिजेत. जनआंदोलनाच्या माध्यमातूनच प्रशासनाला जाग येते. सीमाबांधवांनी समितीशी एकनि÷ राहिले पाहिजे. सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात कर्नाटक सरकार चालढकल करीत आहे. हा भाग महाराष्ट्राचाच असल्याचे पुरावे आमच्याजवळ भक्कम आहेत. त्यामुळे येणाऱया नजीकच्या काळात सीमाभागातील जनतेला नक्कीच न्याय मिळणार आहे. तोपर्यंत मात्र जनतेने एकजूट दाखवून कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य व साक्षीदार दिनेश ओऊळकर यांनी युवा मेळाव्यात केले.

तालुका म. ए. समिती युवा आघाडी व महिला आघाडी यांच्यावतीने जागतिक युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शुक्रवार दि. 12 रोजी मंडलिक मळा, बेनकनहळ्ळी येथे भव्य युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनेश ओऊळकर सीमाप्रश्नाच्या दाव्यासंदर्भात युवापिढीला मार्गदर्शन करताना बोलत होते.

लढा लोकशाही मार्गाने

दिनेश ओऊळकर पुढे म्हणाले, समाजाला समृद्धी ही शांततेच्या माध्यमातून येते. सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही व शांततेच्या मार्गातून सुरू आहे. युवक हा क्रांती घडवू शकतो. त्यामुळे तरुणांनी सीमाप्रश्नाचा लढा अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कर्नाटक सरकारकडून वारंवार होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणाऱया विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीचाच झेंडा फडकवा. तसेच सीमाभागात आतापासूनच बुथ कमिटय़ा नेमल्या पाहिजेत. या कमिटीमध्ये तरुणांना सामील करून घ्या, असे ते म्हणाले.

तसेच 29-3-2004 ला दावा दाखल केला असून सध्या सीमाप्रश्नाच्या खटल्याचे ऍड. हरिष साळवे हे कामकाज पाहत आहेत. याचबरोबर सुरुवातीपासून सीमाप्रश्नाच्या खटल्याची सविस्तर माहिती त्यांनी सांगितली.

छ. शिवाजी महाराजांच्या

आचार-विचारांचा जागर व्हायला हवा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांचा जागर समाजात व्हायला हवा. सर्व जातीधर्माच्या लोकांना घेऊन शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. बळिराजाच्या हितासाठी कार्य केले. त्यांचे शौर्य, पराक्रम, धाडस आणि जनतेप्रती असणाऱया त्यांच्या भावना आजच्या तरुणांनी आत्मसात करायला पाहिजेत. इतक्मया वर्षांच्या सीमाप्रश्नाच्या संघर्षाला यश मिळायचे असेल तर सीमाभागातील युवक जागरुक झाले पाहिजेत, असे बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील शिवश्री खंडू डोईफोडे यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास आणि तरुणांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर खंडू डोईफोडे यांनी व्याख्यान देऊन तरुणांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, संस्कृतीचे जतन करायला शिकले पाहिजे. राजमाता जिजाऊ यांनी बालवयातच शिवाजी महाराजांवर संस्कार घडविले. त्यांना राजनीती शिकविली. त्यामुळे शिवबा घडले.

येळ्ळूर फलक मोडला, पण…

कर्नाटक सरकारने येळ्ळूर फलक मोडला, पण मराठी माणसांच्या मनातील महाराष्ट्रात जाण्याचे प्रेम कसे मोडणार? इथल्या लोकांचा संघर्ष बरेच काही सांगतो आहे. मराठीचा हुंकार असाच हृदयात जिवंत ठेवा, असेही खंडू डोईफोडे म्हणाले.

लता पावशे

राजमाता जिजाऊ याच खऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू आहेत. अन्यायाविरुद्ध वाचा फोडून माणसे व माणुसकी जपण्याचा मंत्र त्यांनी शिवाजी महाराजांना दिला, असे समाजसेविका लता पावशे यांनी ‘राजमाता जिजाऊ’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले. त्यांनी जिजाऊ यांच्या जीवन चरित्राबाबत माहिती दिली.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी निंगोजी हुद्दार हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन लता पावशे, स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन दिनेश ओऊळकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन खंडू डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दीपक दळवी, मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, ऍड. राजाभाऊ पाटील, एल. आय. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष ऍड. शाम पाटील यांनी प्रास्ताविक करून युवा मेळाव्याचा उद्देश सांगितला.

Related posts: