|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » डहाणूत 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली, चार जणांचा मृत्यू

डहाणूत 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली, चार जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पालघर:

डहाणूमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बोटीत 40 विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 32 विद्यार्थ्यांना बजावण्यात यश आले आहे.तर या घटनेत चार जणांचा मृत्यू  झाला आहे

पालघर जिलह्यातील के. एल. पोंडा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. 40 विद्यार्थ्यांना घेऊन डहाणूच्या समुद्रात एक बोट गेली. मात्र अचानक बोट उलटून विद्यार्थी पाण्यात पडले. 2 नॉटिकल अंतरावर ही बोट बुडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात झाली. समुद्रात आजुबाजुला असलेल्या बोटीही विद्यार्थ्यांच्या मदतीला गेल्या आहेत.

 

Related posts: