|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » तुकाराम मुंढेंचा दणका ; पीएमएलचे 158 कर्मचारी बडतर्फ

तुकाराम मुंढेंचा दणका ; पीएमएलचे 158 कर्मचारी बडतर्फ 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे महानगरपरिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तुकारात मुंढे यांनी सतत गैरहजर राहणाऱया बसचालकांवर मोठी कारवाई केली आहे. एकूण 158 बसचालकांना मुंढेंनी बडतर्फ केले आहे.

तुकाराम मुंढे हे शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पीएमपीएमएलचेअध्यक्ष झाल्यापासून त्यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणेच्या दृष्टीने मोठी पावले उचलली आहेत.तुकाराम मुंढे हे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर त्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. सध्या पीएमपीएमएलमधीलही त्यांच्या कामाचा धडाका नेहमीच चर्चेत असतो.