|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » वन प्लस 5टी लावा रेड अखेर भारतात लाँच

वन प्लस 5टी लावा रेड अखेर भारतात लाँच 

ऑनलाईन टीम /

भारतात मागील अनेक दिवसापासून वन प्लस 5टी या फोनची मोठया प्रमाणात चर्चा होती. येत्या 20 जानेवारीला वन प्लस 5टी लावा रेड एडिशन भारतात लाँच होणार असून, ही बाब ग्राहकांसाठी आनंदाची आहे.

वन प्लस 5टी चा तपशील

वन प्लस 5टीचा डिस्प्ले 6.01 इंच पूर्ण एचडी प्लस (1080 x 2160पिक्सेल), 18.5ः9चे रेशो गुणोत्तर फोन, 6जीबी रॅम, 64/128 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची डिझाईन आणि फिचर्स आकर्षक असल्याने हा फोन ग्राहकांच्या पसंतीस पडेल. यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट व 20+16मेगापिक्सलचा बँक कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 37,999 रूपये असून 20 जानेवारीला अमेझॉनच्या सेलवर आणि oneplus.net वर उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीचे महाप्रबंधक विकास अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.