|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘पॅडमॅन’ पुण्यात….

‘पॅडमॅन’ पुण्यात…. 

ऑनलाईन टीम / पूणे

आज सोमवारी पुणे येथे ‘पॅडमॅन’ अक्षयकुमारने हजेरी लावली. ‘पॅडमॅन’ येणार म्हणून पूणेकरांनी एकच गर्दी केली होती. विद्यार्थी आणि महिलांनी सर्व परिसर गजबजून गेला होता.

 

  अक्षयकुमारने मंचावर ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रमोशन केले. मासिक पाळी या विषयावर त्याने प्रबोधन केले. मासिक पाळी ही एक पवित्र बाब आहे. यात विटाळ असे काहीही नाही. देशात सध्या परिस्थिती अशी आहे, की 82 टक्के महिला मासिक पाळीत सॅनिटरी पॅडस् वापरत नाहीत. पाळीदरम्यान त्या राख किंवा मातीचा वापर करतात, याकडे त्याने लक्ष वेधले.

 

  ‘पॅडमॅन’ हा चित्रचट सामाजिक मुद्दय़ावर आधारित आहे. आता बॉक्स ऑफिसवर ‘पद्मावत’ आणि ‘पॅडमॅन’ असा सामना रंगणार आहे.