|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शाखाधिकाऱयाकडूनच बँकेला 4 लाखांना गंडा

शाखाधिकाऱयाकडूनच बँकेला 4 लाखांना गंडा 

बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्जाला मंजुरी

कर्जदारासह तत्कालीन शाखाधिकाऱयावर गुन्हा

‘कोकण मर्कटाईल’संगमेश्वर शाखेतील प्रकार

वार्ताहर /संगमेश्वर

संगमेश्वर बाजारपेठेतील कोकण मर्कटाईल को. ऑप. बँकेच्या तत्कालिन शाखाधिकाऱयाने कर्जदाराच्या मदतीने बॅकेची 4 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जदाराला बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज मंजूर करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी कर्जदार व तत्कालीन शाखाधिकाऱया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै 2012 ते 7 डिसेंबर 2017 या कालावधीत हा प्रकार घडला.

याबाबत बँकेचे विद्यमान शाखाधिकारी जिनत रफिक अहमद वागळे (47 रा. उद्यमनगर रत्नागिरी) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनगिरी येथील मुबीन इब्राहिम कापडे यांना घर बांधणीसाठी कर्ज हवे होते. त्यांनी संगमेश्वर बाजारपेठेतील कोकण मर्कटाईल को. ऑप. बँककडे कर्जासाठी अर्ज सादर केला होता. मात्र कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती.

त्यामुळे तत्कालीन शाखाधिकारी तौफिक इब्राहिम मालीम यांच्याशी संगनमताने कापडे यांनी कर्जप्रकरणासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे खोटी असल्याचे माहित असतानाही मालीम यांनी कर्ज मंजूर करून बँकेची फिर्यादीत म्हटले आहे. तत्कालीन शाखाधिकारी मालीम व कर्जदार मुबीन कापडे यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी बँकेचा विश्वासघात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्युनसार या दोघांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: