|Saturday, July 20, 2019
You are here: Home » क्रिडा » केरळ ब्लास्टर्सची मुंबई सिटीवर मात

केरळ ब्लास्टर्सची मुंबई सिटीवर मात 

वृत्तसंस्था / मुंबई

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या सामन्यात कॅनडाचा फुटबॉलपटू इयान हुमेच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर केरळ ब्लास्टर्स संघाने मुंबई सिटी एफसी संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात खेळताना केरळ ब्लास्टर्स संघातील कॅनडाचा हुमेने आपल्या डोक्याला बॅडेज केले होते. 23 व्या मिनिटाला केरळ ब्लास्टर्सचा एकमेव विजयी गोल हुमेने केला. या विजयामुळे केरळ ब्लास्टर्सने 10 सामन्यांतून 14 गुणांसह मुंबईसमवेत संयुक्त पाचवे स्थान मिळविले आहे. मुंबई एफसीचा या चालू फुटबॉल हंगामातील घरच्या मैदानावर दुसरा पराभव आहे. या स्पर्धेत आता केरळ ब्लास्टर्सचा पुढील सामना 17 जानेवारीला जमशेदपूर एससी संघाबरोबर होणार आहे. मुंबई सिटी एफसीचा पुढील सामना बेंगळूर एफसी संघाबरोबर 18 जानेवारी खेळविला जाईल.