|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वेणेगाव सरपंचपदी मंगल यादव बिनविरोध

वेणेगाव सरपंचपदी मंगल यादव बिनविरोध 

वार्ताहर/ देशमुखनगर

 वेणेगाव (ता सातारा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अजिंक्य पॅनलच्या नियोजित धोरणानुसार दोन वर्षाचा कार्यभार पूर्ण झाल्याने सरपंच संध्या घोरपडे यांनी राजीनामा दिला होता. तर हे पद रिक्त झाल्याने त्यांच्या जागी मंगल यादव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड अपशिंगे मंडल अधिकारी एस. जी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपसरपंच भगवान सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, धनंजय शेडगे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन राजू पाटील, रामभाऊ जगदाळे, रविंद्र कदम, चंद्रकांत जाधव, सुनील काटे, विठ्ठल सावंत, वैभव चव्हाण यांनी नुतन सरपंच मंगल यादव यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.

विठ्ठल सावंत(आबा) यांनी नूतन सरपंच निवडीसाठी विशेष परिश्रम घेतले.

सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणून ग्रामसेवक प्रशांत फडतरे यांनी काम पाहिले

यावेळी डॉ. माणिक सावंत, रुपेश चव्हाण, कृष्णात काटे, महेश काटे, उद्धव घोरपडे, मारुती कांबळे, अजित काटे, संभाजी देशमुख, शंकरराव राऊत, संजय यादव, प्रमोद सावंत, बबन देशमुख, अकबर मुलाणी, रामचंद्र कांबळे, भिमराव चव्हाण उपस्थित होते.