|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » गोंधळ घालून सरकारचा निषेध ; राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला तुळजापुरातून सुरूवात

गोंधळ घालून सरकारचा निषेध ; राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला तुळजापुरातून सुरूवात 

ऑनलाईन टीम / तुळजापूर  :                                 

राज्यातील भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱया टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. तुळजापूरच्या भवानीमातेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गोंधळ घातला. गोंधळातून यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.

सुनिल तटकरे, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते. विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी, दूध आणि शेतीमालासाठी हमीभाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना मदत, आरक्षण इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Related posts: