|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » राशीभविष्य

राशीभविष्य 

वार्षिक राशीभविष्याविषयी थोडेसे स्पष्टीकरण

बुध. दि. 17 ते 23 जानेवारी 2018

वार्षिक राशीभविष्याविषयी अनेकांना उत्कंठा असते. देवधर्म व ज्योतिष वगैरे न मानणारेदेखील आपले भविष्य अत्यंत चवीने वाचत असतात, कारण पुढे काय वाढून ठेवले आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. सर्वसाधारणपणे तरुण भारतमध्ये जे भविष्य दिलेले असते ते निरयन पद्धतीने म्हणजेच जन्मतारीख व वेळ या आधारे दिलेले असते तर पाश्चात्य लोक सायन पद्धतीनुसार भविष्य पाहतात. दर महिन्यानुसार त्यांच्या राशी त्याच असतात. उदा. 15 मे 15 जून या महिन्यात कोणत्याही तारखेला जन्म असेल तर त्या सर्वांची रास एकच समजतात. भारतीय निरयन पद्धती ही चंद्र व नक्षत्रावर तसेच त्यांच्या चरणावर ठरत असतात व हीच पद्धती योग्य व सूक्ष्म आहे व पाश्चत्यानीही हे मान्य केलेले आहे. 2018 सालचे 1 ते 12 जानेवारी दरम्यान मेष ते मीन राशीपर्यंत जे भविष्य दिलेले आहे ते निरयन पद्धतीनुसार आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीत जी जन्मरास नक्षत्र अथवा लग्न असेल त्यानुसार हे भविष्य पहावे सर्व राशीत जे फोटो दिलेले आहेत ते सायन पद्धतीनुसार दिलेले आहेत. कारण नटनटय़ा राजकीय व्यक्ती तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या खऱया जन्मतारखा वेळ व नक्षत्रे अथवा राशी समजणे अत्यंत कठीण असते व जरी त्यांच्या तारखा सापडल्याच तर त्या खऱया असतीलच याची खात्री नसते. पेपरात दिलेल्या राशी व जे फोटो छापलेले आहेत त्यांचा ताळमेळ जुळत नाही असे अनेकांनी फोनवरून कळविले आहे, त्यासाठी हे स्पष्टीकरण दिलेले आहे. दैनिक राशिभविष्य असो वा साप्ताहिक किंवा वार्षिक भविष्य लिहिताना राशी, नक्षत्रे, योग, अमावास्या,पौर्णिमा, शुभाशुभ ग्रहयोग, करिदिन, पद्मयोग, लुंबक योग, आनंद योग, ध्वांक्ष, श्रीवत्स उत्पात, मृत्यूयोग, व्यतिपात व वैधृती तसेच कार्यसिद्धीयोग राक्षस व काण योग, वृद्धीयोग या सर्वांचा विचार केलेला असतो. प्रत्येकाच्या राशी व नक्षत्रे घराण्याचा इतिहास परंपरा चालीरिती व कुलदेवत गौत्र, कुळ व सामाजिक परिस्थिती निरनिराळी असते. त्यानुसार प्रत्येकाच्या भविष्यातही फरक पडत जातो. गुरु, राहू, केतू, शनि,हर्षल, नेपच्यून व प्लूटोसारखे ग्रह दीर्घ कालाने बदलत असतात. त्यामुळे ज्या ज्यावेळी इतर ग्रहांचे परीभ्रमण त्यांच्या मोठय़ा ग्रहावरून होत असते. त्या त्यावेळी मोठय़ा व  महत्त्वाच्या घटना घडतात. किंवा पूर्वीच्याच घटनांची पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे काही वेळा तीच वाक्मये तेच भविष्य असल्याचा भास होतो व जुनेच भविष्य छापले आहे की काय अशी शंका काहीजण उपस्थित करतात. वास्तविक तसे काही नसते. एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करायला मोठे मन असावे लागते पण सहसा असे घडत  नाही काहीजण फोनवरून आपले भविष्य सांगा म्हणतात पण प्रत्यक्ष या म्हटले की यांचा आवाज बंद होतो. वृत्तपत्रातील भविष्य हे सर्व बाजूने अभ्यास करून दिलेले असले  तरी प्रत्येकाला ते लागू पडतेच असे नसते. कारण प्रत्येकाच्या जन्मवेळी उदीत असणारे अंश व नक्षत्र तसेच चरणे यानुसार त्यात निश्चित फरक पडतो. त्यामुळे वार्षिक अथवा साप्ताहिक भविष्याचा पडताळा तारतम्याने घ्यावा हे योग्य ठरेल.

 

मेष

दर्शअमावास्या भाग्यस्थानी होत आहे. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. मानसन्मान, प्रति÷ा वाढेल. संततीविषय सर्व इच्छा पूर्ण होतील. अशक्मय वाटणारे एखादे काम हातावेगळे होईल. धाडशी निर्णय घेवून ते अमलात आणाल. रवी, शुक्र, केतू, युतीचा प्रभाव चालू आहे. सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावी लागतील. नोकरी वगैरे सांभाळून ठेवणे आवश्यक.


वृषभ

भाग्यस्थानावर रवि, शुक्र, केतुचा प्रभाव वाढत आहे. साध्यासुध्या बाबी उग्र स्वरुप धारण करू शकतात. त्यासाठी काळजी घ्यावी. मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. सरकारी अधिकाऱयांशी जपून बोला. तडकाफडकी कोणतेही निर्णय घेवू नका. अमावस्या शुभस्थानी होत असल्याने अनेक मार्गाने धनलाभाची शक्मयता. विवाह व नोकरी व्यवसायात चांगले यश.


मिथुन

रवी, शुक्र, केतू अमावस्या योगात व तेही सप्तमस्थानी आहेत. हा योग चांगला नसतो. कुणाच्याही रुपाने केव्हाही अचानक संकटे येऊ शकतात. सर्व बाबतीत जपणे हाच मूलमंत्र समजावा. हर्षल लाभात हा अत्यंत शुभ व दैवी आशीर्वादाचा योग आहे. भाग्योदय भरभराटीच्या दृष्टीने चांगले योग. अनेक इच्छा पूर्ण होतील. जीवनाला कलाटणी देणाऱया शुभ घटना. अचानक बदली, नोकरीत स्थलांतर होण्याची शक्मयता.


कर्क

सहाव्या स्थानी रवी, शुक्र, केतू, अमावस्या योगात आहेत. आरोग्याच्या बाबतीत काही समस्या निर्माण करील. पण आर्थिक बाबतीत चांगले अनुभव येतील. प्रवास योग, कुठेही बोलताना शब्दात अडकू नका. संधीचा योग्य वापर केल्यास जीवनाचे सोने करू शकाल. संततीच्या बाबतीत अविस्मरणीय घटना. दशमात हर्षल अत्यंत चमत्कारीक पण भाग्योदयकारक योग. कुणाचे नशिब कसे फळफळेल सांगता  येणार नाही. बेकारांना नोकरी मिळण्याचे योग.


सिंह

अमावस्या योगात रवी, शुक्र, केतूचा योग होत आहे. बदली बढती अथवा स्थलांतराला सामोरे  जावे लागेल. धोकादायक प्रेमप्रकरणात गुंतू नका. आर्थिक बाबतीत मोठे यश किंवा ऐश्वर्य लाभेल. सर्व क्षेत्रात लाभदायक. उत्कर्षाची कोणतीही संधी सोडू नका. हर्षलच्या साहाय्याने अवघड कामातदेखील सहज यश मिळवाल. अपघात, आजार, गैरसमज शस्त्रक्रिया, शत्रुत्व यापासून रक्षण होईल.


कन्या

अमावस्या योगात रवी, शुक्राचे भ्रमण,प्रेमप्रकरणे, विवाह, धनलाभ, भागीदारी व्यवसाय व कोर्टप्रकरणे या बाबतीत चांगले यश देईल. शेअर बाजारात केलेली गुंतवणूक, अपहरण, पैजा, स्कूबा डायव्हिंग, खोल दऱयांत प्रवास, जुगार व व्यसन यामुळे अडचणीत याल. साधकबाधक सर्व गोष्टीचा विचार करूनच पुढील धोरण आखावे.


तुळ

राश्याधिपती शुक्र अमावस्या योगात रवी, केतुच्या सान्निध्यात आहे. काहीतरी करायला जावून वेगळेच काहीतरी कराल. कारखानदारी जमीन, जागा, प्लॉट, फ्लॅट या व्यवहारातून धनलाभाची शक्मयता. हर्षल सप्तमात आहे.कोर्टमॅटर, प्रवास, शत्रुपीडा व अपघातापासून जपावे लागेल. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेताना काही तरी  चुकण्याची शक्मयता आहे.


वृश्चिक

धनस्थानी अमावस्यायोगात रवि, केतू योग चांगला नाही. खर्च वाढतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने कटकटीचे योग. नको त्या ठिकाणी बदली होण्याची शक्मयता. सहाव्या स्थानातील हर्षल निष्कारण खोडी काढण्याची शक्मयता असल्याने कुणाच्याही कोणत्याही प्रकरणात गुंतू नका. तसेच शत्रुत्वाला प्रोत्साहन देऊ नका.


धनु

लाभस्थ गुरुमुळे आर्थिक बाबतीत अनुकूल योग. चंद्र हर्षलच्या त्रिकोण योगात भव्य दिव्य असे काही तरी घडवाल. धनलाभ, प्रवास, शिक्षण, नोकरी व संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. दैवी, साक्षात्कार, दिव्य अनुभूती या बाबतीत शुभ योग. वास्तु संदर्भात महत्त्वाच्या घटना, स्वत:चे वाहन, घरदार, पैसा अडका या बाबतीत गुप्तता बाळगणे आवश्यक ठरेल.


मकर

मोक्षस्थानी अमावास्या योगात रवी, केतू शुक्राचा योग कौटुंबिक जीवनात काही तरी खळबळ माजविण्याची शक्मयता. गुरु अत्यंत शुभ आहे. एखाद्या कर्तृत्ववान माणसाला शनिपीडा सुरू असल्याने काही कामे खोळंबतील. मन शांत ठेवून मगच निर्णय घ्यावेत. चतुर्थात हर्षल योग वास्तुच्या बाबतीत चमत्कारीक फळे देण्याची शक्मयता आहे. जागा, बदल अथवा स्थलांतराचे योगही दिसतात.


कुंभ

रवी, केतू, शुक्र, अमावस्या योगात व तेही लाभस्थानी हा योग चांगला आहे. सर्व कार्यात यश देईल. स्वत:चे कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. धनलाभाचे योग मोठय़ा प्रमाणात लाभ होण्याचे योग. वास्तू, जागा, वाहन यांची हौस पूर्ण होईल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा स्वतंत्र ठसा उमटेल. शुक्राचे गुरु व शुक्राचे भ्रमण सर्व बाबतीत मंगलमय वातावरण निर्माण करील.


मीन

महत्त्वाच्या दशमस्थानी अमावस्या योगात रवी, केतू, शुक्र काही तरी नवे करून दाखविण्याची प्रेरणा देतील. धनस्थानी हर्षल असल्याने आर्थिक बाबतीत सावध रहावे लागेल. अचानक नवे खर्च निर्माण होतील. आतापर्यंत अत्यंत अवघड वाटणारी काही कामे पूर्ण होतील. मोठमोठय़ा कामात यश मिळवाल. घरात कुणाचे तरी मंगलकार्य ठरेल.