|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सरन्यायाधीशांनी घेतली नाराज न्यायाधीशांची भेट

सरन्यायाधीशांनी घेतली नाराज न्यायाधीशांची भेट 

मतभेदांवर तोडग्याची प्रक्रिया गतीमान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशाचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा यांनी चार नाराज न्यायमूर्तींची अखेर भेट घेतली आहे. मंगळवारी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांनी या चार न्यायाधीशांना आपल्या कक्षात चहासाठी बोलाविले होते. त्यावेळी त्यांची 15 मिनिटे चर्चा झाली. बुधवारीही ती पुढे सुरू राहणार आहे.

मंगळवारच्या भेटीप्रसंगी आणखी तीन न्यायाधीशही उपस्थित होते. त्यात ज्येष्ठ न्यायाधीश ए. के. सिक्री यांचाही समावेश होता. मतभेद मिटविण्यासाठीचे हे कदाचित पहिले पाऊल असावे, असे मत या तीन न्यायाधीशांनी व्यक्त केले. तथापि, अद्यापही सरन्यायाधीश आणि नाराज न्यायाधीश यांच्यात संपूर्ण समझोता झाला नसल्याचे या घडामोडींवरून दिसून येते, असे मत काही कायदेतज्ञांनी व्यक्त केले.

महाधिवक्त्यांचे विधान मागे

केंद्र सरकारचे महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी मतभेद दूर झाले आहेत, असे विधान सोमवारी केले होते. ते त्यांनी मंगळवारी मागे घेतले. अद्याप मतभेद दूर झालेले दिसत नाहीत. मात्र ते येत्या तीन चार दिवसात दूर होतील, असे म्हणणे त्यांनी मांडले. न्या. चलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या चार नाराज न्यायाधीशांची आणि आपली भेटही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनापीठाची स्थापना

सर्वोच्च न्यायालयाकडे असणाऱया महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणांची हाताळणी करण्यासाठी सरन्यायाधीशांनी 5 सदस्यांच्या घटनापीठाची स्थापना केली आहे. मात्र त्यात या चार नाराज न्यायाधीशांपैकी कोणाचाही समावेश नाही.

Related posts: