|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विशालतीर्थ यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात

विशालतीर्थ यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात 

वार्ताहर / बालिंगा

करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील विशालतीर्थ यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात पार पडली.

     पौराणिक असे महात्म्य असणाऱया या यात्रेसाठी जिह्याच्या कानाकोप्रयातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी पौष अमावस्येला पंचगंगा नदी तीरावर ही यात्रा भरते.

      मंगळवारी पहाटे नदी घाटावरील शिव मंदिरातील आणि नरसिंह मंदिरातील मूर्तींना तीर्थ अभिषेक,पूजा विधी करून यात्रेस प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हणमंतवाडी येथील बिरदेवाची पालखी वाजत गाजत यात्रा स्थळावर दर्शनासाठी ठेवण्यात आली.

      पहाटे परिसरातील भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर स्नान करून देवदर्शन करून भाविक घरी परतताना दिसत होते. दुपारनंतर मात्र भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

    यात्रा स्थळावर खेळण्यांची दुकाने,पाळणे,झोपाळे, खाद्य पदार्थांची दुकाने, थंड पेयाची दुकाने तसेच इतर स्टोलची पण गर्दी होती.लहान मुले पाळणे झोपाळे यमधेय दिवसभर मौज मस्ती करताना दिसत होती,

      यावर्षी यात्रेनिमित्त ग्रामपंचयत आणि यात्रा कमिटी यांच्यावतीने नेटके नियोजन केले होते. कचरा टाकण्यासाठो जागोजागी बॉक्स ठेवले होते. स्नानाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्हाईट आर्मीचे लोक होते,सकाळी पहाटे स्नानासाठी आलेल्या लोकांना गावातील अजित चौगले, बाजीराव पाटील, उत्तम मस्कर यांच्या ग्रुपच्या वतीने भाविकांना फराळ वाटप करण्यात आले,करवीर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर के एम टी च्या वतीने लोकांच्या सोईसाठी गंगावेश येथून शिंगणापूरला बसची सोय केली होती.ग्रामपंचयटीच्यावतीने यात्रास्थळावर स्वागत कक्ष केला होता. या ठिकाणी सरपंच प्रकाश रोटे, उपसरपंच अर्जुन मस्कर यांच्यासह पदाधिकारी स्वागतासाठी दिवसभर थांबले होते.

Related posts: