|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » त्या पाकिटाचे गौडबंगाल काय?, पोलीसमामा तुम्हीच सांगा

त्या पाकिटाचे गौडबंगाल काय?, पोलीसमामा तुम्हीच सांगा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा यावेळी पोलीस बंदोबस्तात पार पडली. या बंदोबस्ताला असलेल्या एका कर्मचाऱयांना पालिकेच्या शौचालयात जावून एका कार्यकर्त्यांने दिलेले बंद पाकिट खोलले. त्या पाकिटात करकरीत नोटा खिशात घातल्या. तो कार्यकर्ता कोण?, पालिकेतच का ते पाकिट पोलीस कर्मचाऱयाला दिले याबाबत पोलिसांकडून अजूनही उघडकीस आणले नाही. परंतु या घटनेबाबत जोरदार फोनाफोनी झाल्याचे समजते. पोलिसांनी पालिकेत (?) असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासावे, अशी मागणी होवू लागली आहे.

सातारा पालिकेत पोलीस बंदोबस्तात सभा पार पडली. सुमारे 15 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते. यातील काही पोलीस हे साध्या वेशात पालिकेच्या इमारतीत होते. सभा चांगलीच रंगात आली असताना एका गटाचा एक पूर्व भागातील कार्यकर्ता हातात पाकीट घेवून आला अन ते पाकिट साध्या वेशात असलेल्या पोलीस कर्मचाऱयाच्या हातात टेकवले अन तोही निघून गेला. त्या कर्मचाऱयाने खुशीतच शौचालय गाठले. पुढे, पाठीमागे कोण आहे नाही याचाही विचार न करता त्याने ते पाकिट फोडले. पाकिटातील नोटांची करकरीत बंडले खिशात दुमडून टाकली अन् तो बाहेर पडला. बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या बांधवांमध्ये तो सामिल झाला. त्याच दिवशी याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु होती. त्यावरुन अनेकांची फोनाफोनीही झाली. परंतु तो कार्यकर्ता कोण?, पोलीस कर्मचाऱयाने पैशाचे पाकिट कशासाठी दिले हेच सातारा पोलिसांनी पालिकेत असणाऱया सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासून पाहवे, अशी मागणी होवू लागली आहे.

पालिकेची सीसीटीव्ही यंत्रणा नक्की कुठे आहे?

मनोमीलनाच्या काळात सीसीटीव्ही यंत्रणा तात्कालिन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रयत्नाने पालिकेच्या इमारतीत सीसीटीव्ही यत्रंणा कार्यन्वित केली होती. त्याचे आठ कॅमेरे होते. दोन कॅमेरे दोन्ही दरवाजामध्ये, दोन कॅमरे पॅसेजमध्ये, एक कॅमेरा गच्चीवर असे आठ कॅमेरे होते. त्याचे प्रक्षेपण थेट बापट यांच्या मोबाईलवर आणि नगराध्यक्षांच्या केबीनमध्ये व उपाध्यक्षांच्या केबीनमध्ये दिसत होते. परंतु मनोमीलनाच्या कारभारानंतर सातारा विकास आघाडीची सत्ता आली. तसेच मुख्याधिकारीही बदलले. कॅमेरे सध्या सुरु आहेत की बंद, त्याचे चित्रीत झालेला भाग कोठे संकलित होतो याचे सातारकरांना काहीच प्रचिती नाही. त्यामुळे पालिकेतील सीसीटीव्ही यंत्रणा गायब झाल्याचीच चर्चा रंगू लागली आहे. पालिकेच्या इमारतीत पाकिट वाटपाचे प्रकार वाढू लागले आहेत.