|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडी जिल्हा भाजपातर्फे जेलभरो आंदोलन

चिकोडी जिल्हा भाजपातर्फे जेलभरो आंदोलन 

वार्ताहर /  चिकोडी

 मुख्यमंत्री सिद्धरामय्या व केपीसीसी कार्याध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व श्रीराम सेनेस उग्रवादी म्हटले आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी चिकोडी जिल्हा भाजपातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला.

प्रारंभी मिनी विधानसौधसमोरील केशव भवन येथून निषेध रॅलीला सुरुवात झाली. निषेधाच्या घोषणा देत रॅली बसवसर्कलला आली. त्यानंतर जेलभरो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी, राष्ट्र बांधणीचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व श्रीराम सेना करत आहे. या संघांच्या कार्याला उग्रवादी म्हणणाऱयांनी जाहीर माफी मागावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष गुंडूराव यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे. तशी त्यांनी जाहीर कबूली द्यावी अन्यथः माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 यावेळी घटनास्थळी फौजदार संगमेश होसमणी यांच्यासह सहकाऱयांनी सर्व भाजपा लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस स्थानकास नेवून सुटका करण्यात आली. यावेळी चिकोडी जिल्हा भाजपा ब्लॉक अध्यक्ष शशिकांत नाईक, आमदार महांतेश कवटगीमठ, सहकारनेते आण्णासाहेब जोल्ले, ऍड. नागेश किवड, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चिदानंद सवदी, ऍड. सतिश आप्पाजीगोळ, गुरुराज कुलकर्णी, राजू ऐतवाडे, मंडल अध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव मानवी, संजय शिंत्रे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

Related posts: