|Sunday, January 20, 2019
You are here: Home » उद्योग » बंगालमध्ये 2.20 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव

बंगालमध्ये 2.20 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव 

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील खाद्यतेल शुद्धीकरणाच्या प्रकल्पाची क्षमता दुप्पट करण्यासाठी अदानी समुहाकडून 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटच्या शेटवच्या व दुसऱया दिवशी 2,19,925 कोटी रुपयांच्या नवीन गुंतवणुकीचे प्रस्ताव आल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गेल्या वर्षातील 50 टक्के प्रस्तावांचे काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले. प्रणव अदानी यांनी बंदर, कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. अदानी समुहाकडून आपल्या प्रकल्पाची क्षमता पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पातून प्रतिदिनी 1,600 टन उत्पादन घेण्यात येते. याव्यतिरिक्त राज्यातील कृषी भांडार आणि वेअरहाऊसिंग व्यवसायातही विस्तार करण्यात येणार आहे.

या क्षेत्रात 2020 पर्यंत 4,300 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात 12 हजार नवीन रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल. 2015 मध्ये 2.43 लाख कोटी आणि 2016 मध्ये 2.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले होते.

Related posts: