|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » सरकारकडून अतिरिक्त कर्जात कपात

सरकारकडून अतिरिक्त कर्जात कपात 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षासाठी सरकारने अतिरिक्त कर्जाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला. सरकारने यापूर्वी 50 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यात येईल असे म्हटले होते. मात्र आता या रकमतेत 30 हजार कोटी रुपयांनी कपात करण्यात आली.

चालू वर्षात मिळालेला महसूल आणि खर्चाचा आढावा घेण्यात आल्यानंतर 20 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्जाची आवश्यकता भासेल असे म्हणण्यात आले. चालू वर्षात जीएसटीमधून मिळणाऱया कर संकलनात घट होत आहे. मात्र प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाली आहे.

गेल्या तीन लिलावादरम्यान पार पडलेल्या 15 हजार कोटीची रक्कम सरकारकडून घेण्यात आलेली नाही. उर्वरित 15 हजार कोटी रुपये आगामी आठवडय़ात उधार न घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे अर्थ व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले.

सरकारला आवश्यक असणाऱया 20 हजार कोटी रुपयांची आवश्यकता सरकारकडील सिक्युरिटीजमधून उभारण्यात येईल असे अर्थ मंत्रालयाने म्हटले. याव्यतिरिक्त आरबीआयकडून सरकारला 30,659 कोटी रुपयांचा लाभांश देण्यात येणार आहे.

Related posts: