|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रोजगार हमी योजने अंतर्गत 4 हजार कामे सुरु

रोजगार हमी योजने अंतर्गत 4 हजार कामे सुरु 

प्रतिनिधी/ सोलापूर

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत या वर्षी 4 हजार 69 कामे सुरु असून या अंतर्गत 23 हजार 540 व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत एकूण 6 कोटी रुपये मजुरी अदा करण्यात आली आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किशोर पवार यांनी दिली.

केंद्र शासनाकडून 100 दिवसांची मजूरी देण्यात येते. त्यावरील खर्च हा राज्य शासन करते. मग्रा रोहयो अंतर्गत यावर्षी 4 हजार 69 कामे सुरु झाली आहेत. त्यापैकी ग्रामपंचायती स्तरावर 3 हजार 123 कामे, कृषी-795, रेशीम – 143 कामे चालू आहेत. ग्रामपंचायतीकडून घरकुलची 2 हजार 977, शोषखड्डे – 76, शेततळे – 10, विहिर पुनर्भरण – 39, रस्ते – 10 ही कामे सुरु आहेत.

या योजनेअंतर्गत वर्षाकाठी 10 कोटीच्या कामाचे उद्दिष्ठ आहे. वास्तविक पाहता शासनाकडून पाहिजे तिथक्या कामाचे पैसे मिळतात. 13 हजार 531 कुटूंबियास तर 23 हजार 540 व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. 3 लाख 46 हजार 842 मनुष्य दिवस आतापर्यंत काम झाले आहे. प्रत्येकास 201 रुपये किमान मजूरी दिली जाते. साधारणतः यापैकी प्रत्येक माणसाला 70 ते 80 दिवस रोजगार मिळाला आहे. त्यांना 6 कोटी रुपये मजूरी अदा केली आहे. एप्रिल ते आजतागायत एकूण खर्च 9 कोटी 3 लाख रुपये झाला आहे. त्यापैकी साहित्यासाठी 3 कोटी रुपये खर्च आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने काम करणे अपेक्षित आहे. 11 कलमी समृद्धा महाराष्ट्र जनकल्याण योजना राबवावी या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. वैयक्तिक लाभाच्या योजना चालू आहेत. घरकुल बांधण्यासाठी वैयक्तिक काम मिळते. यामध्ये मजूरास 18 हजार रुपये अधिक मजूरी मिळते.

यंदा पाऊस झाल्याने विहिरीचे पुनर्भरण करता येऊ शकते. याचे काम देता येईल. शौचालय बांधणे, झाडे जगवणे, फळबाग करणे आदी कामे चालू आहेत.