|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निष्ठावान शिवसैनिक म्हणूनच खाजगी कार्यालय सुरु केले

निष्ठावान शिवसैनिक म्हणूनच खाजगी कार्यालय सुरु केले 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा हे जिह्याचे ठिकाण आहे. शहरात सेनेचे कार्यालय म्हणून नाही तर शिवसैनिकांच्या इच्छेखातर मी घरातच खाजगी कार्यालय सुरु केले आहे. हे कार्यालय कधीच बंद नसते. शिवसैनिकांच्या हाकेला कधीही, केव्हाही 24 तास या कार्यालयातून वाटेल ती मदत होते. कार्यकर्त्यांची सतत वर्दळ सुरु असते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब यांच्या विचारांवर  मी काम करतोय, अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख ऍड. शिरीष दिवाकर यांनी दिली.

शहरात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न व्हावेत. तसेच ग्रामीण भागातून आलेल्या शिवसैनिकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी निष्ठावान शिवसैनिक म्हणून घरातच कार्यालय सुरु केले. ज्या दिवशी आम्ही बाहेरगावी गेलो होतो. त्याच दिवशी फक्त कार्यालय बंद होते. इतर दिवशी 24 तास कार्यालय सुरु असते. इतकेच नाही तर शहरातील नव्या जुन्या शिवसैनिकांची सतत कार्यालयात वर्दळ असते. जिल्हा कार्यालय सुरु होण्यापूर्वीपासूनच हे कार्यालय होते आणि आजही आहे. माझ्या घरातच हे कार्यालय असल्याने भाडे देण्याचा प्रश्नही येत नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार निष्ठावान शिवसैनिक घडविण्याचे काम माझ्याकडून झाले आहे. शहरातील अनेक युवकांना शिवसेनेत खेचून आणले आहे. एवढेच नाही तर युती शासनाच्या काळात 1995 – 99 च्या दरम्यानही शहरात भगवं वादळं उभं करण्याचं काम याच कार्यालयातून झालं. आताही माझ्याकडे पद नसले तरीही मी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करतो

हे कार्यालय सतत सुरु असते, अशी स्पष्टोक्तीच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख ऍड. शिरीष दिवाकर यांनी दिली.

सेनेचे जिल्हा कार्यालय लवकरच सुरु

सेनेचे जिल्हा कार्यालय स्वमालकीच्या जागेत स्थलांतर करण्याच्या कारणास्तव पाच महिन्यांपूर्वी ते बंद झाले. ते लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच शिवसेनेचे ऍड. शिरीष दिवाकर यांनी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांच्या घरात कार्यालय सुरु केले. ते कार्यालय त्यांचे वैयक्तिक आहे. ते एका शिवसैनिकाचे कार्यालय आहे, असे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. 

शिवसेनेचे शहर कार्यालय सुरु केलेले नाही

मी शहर प्रमुख आहे. शिवसेनेचे शहर कार्यालय सुरु केलेले नाही. जेव्हा शिरीष दिवाकर हे शहर प्रमुख होते तेव्हा त्यांनी स्वतः कार्यालयाला बाहेर शहर कार्यालयाचा बोर्ड लावला आहे. तो अजूनही तसाच आहे. शहर कार्यालयाचा आणि त्यांच्या कार्यालयाचा काहीही संबंध नाही.

Related posts: