|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अभाविपतर्फे शहरातून तिरंगा रॅली

अभाविपतर्फे शहरातून तिरंगा रॅली 

प्रतिनिधी/ बेळगाव

राष्ट्रीय एकात्मतेसाठी बुधवारी शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. 300 मीटर इतका लांब तिरंगा ध्वज या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला. देशप्रेम जागविणाऱया घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून चिकोडी येथील शिवानंद मठाचे कैवल्यानंद स्वामीजी व कारंजीमठाचे शिवयोगी स्वामीजी उपस्थित होते.

कोल्हापूर सर्कल येथून सुरु झालेल्या या भव्य रॅलीची चन्नमा चौक मार्गे धर्मवीर संभाजी चौक येथे सांगता झाली. यानंतर झालेल्या सभेमध्ये मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना कैवल्यानंद स्वामीजी म्हणाले, आपला देश हा धार्मिक देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. आपली संस्कृती, आपले संस्कार हे आपण जपले पाहिजेत, आणि ही जबाबदारी युवकांवर असल्याचे त्यांनी सांगितले.

अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पृथ्वीकुमार म्हणाले, जितके बेळगाव आमचे आहे. तितकेच काश्मिरही आमचे आहे. काही देशातंर्गत व देशा बाहेरील शक्ती देश विघातक कृत्य करीत आहे. देशाविरोधी घोषणा देणाऱया हे देश द्रोहीच. देशात राहून यांची देशविरोधी बोलण्याची हिंमत होतेचं कशी. विजापूर येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात अभाविप मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहर सेपेटरी रोहीत उमदापूरीमठ याने आभार मानले. यावेळी विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी व अभाविप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

 

Related posts: