|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘ओप्पो ए83’ स्मार्टसेल्फी फोन 20 जानेवारीपासून उपलब्ध

‘ओप्पो ए83’ स्मार्टसेल्फी फोन 20 जानेवारीपासून उपलब्ध 

ऑनलाईन टीम /

ओप्पो ए83 हा स्मार्ट सेल्फी स्ट्रिक कॅमेरा 20 जानेवारीपासून लवकरच ग्राहकांच्या भेटीला येत आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्टय़े म्हणजे यात फेसअनलॉक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

   ‘ओप्पो ए83’मध्ये फेसअनलॉक टेक्नोलॉजीसह 18ः9चे रेशोडिस्प्ले, 5.7इंच टीएफटीडिस्प्ले 1440×720पिक्सेल. स्मार्टफोनमध्ये 3जीबी रॅम तर 32 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हा स्मार्टफोन स्वतःच्या कलर ओएस 3.2, सोबत एंड्रोइड 7.1 वर आधारीत आहे.

   फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा तर 13 मेगापिक्सलचा बँक कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरी कॅपसिटी 3180एमएएच एवढी आहे. या फोनची अंदाजे किंमत 13,990 रूपये असून 20 जानेवारीला ऍमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल.