|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » कार पेटविणारा माथेफिरू निघाला डॉक्टर!

कार पेटविणारा माथेफिरू निघाला डॉक्टर! 

प्रतिनिधी /बेळगाव :

शहर व उपनगरात घराबाहेर उभी करण्यात आलेली वाहने पेटविणाऱया माथेफिरू युवकाला बुधवारी रात्री एपीएमसी पोलिसांनी विश्वेश्वरय्यानगर येथे अटक केली आहे. तो बिम्समध्ये डॉक्टर असून दोन दिवसात त्याने 13 वाहने पेटविली आहेत. या डॉक्टरने गुलबर्गा येथेही 15 हून अधिक वाहने पेटविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, मार्केटचे एसीपी शंकर मारिहाळ, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची, सीसीबीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, कॅम्पचे पोलीस निरीक्षक सुदर्शन पट्टणकुडे आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ. अमित विजयकुमार गायकवाड (वय 37) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा प्रतिभानगर-गुलबर्गा येथील राहणारा असून सध्या सदाशिवनगर येथे त्याचे वास्तव्य होते. येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (बिम्स) पॅथॉलॉजी विभागात तो सेवा बजावत होता. गेल्या दहा वर्षांपासून तो बिम्समध्ये काम करतो. मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी रात्रीपर्यंत त्या माथेफिरूने 13 वाहने पेटविली आहेत.

मंगळवारी मध्यरात्री 3.30 ते 4.30 या वेळेत जाधवनगर परिसरात सात वाहनांना आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर बुधवारी रात्री बेळगाव पोलिसांनी सतर्कता बाळगली होती. स्वतः पोलीस उपायुक्तांसह सर्व अधिकारी रात्रीच्या गस्तीवर होते. त्यावेळी बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला एक फोन आला. विश्वेश्वरय्यानगर परिसरात एका संशयिताला पकडून ठेवल्याची माहिती कंट्रोल रुमला मिळाली. त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी विश्वेश्वरय्यानगर येथे दाखल झाले.

Related posts: