|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जखमी विद्यार्थ्याची योगींनी केली विचारपूस

जखमी विद्यार्थ्याची योगींनी केली विचारपूस 

लखनौ / वृत्तसंस्था :

उत्तरप्रदेशची राजधानी लखनौ येथील ब्राइटलँड स्कूलमध्ये देखील गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलसारखी घटना झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत जखमी विद्यार्थी येथील रुग्णालयात दाखल असून गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तेथे जात त्याची विचारपूस केली. तर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे.

लखनौतील ब्राइटलँड स्कूलमध्ये पहिलीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यावर मंगळवारी चाकुने हल्ला झाला. हल्ल्याचा आरोप शाळेतील एका विद्यार्थिनीवर आहे. विद्यार्थ्याने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटविली आहे. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित शाळेच्या बाहेर शेकडो पालकांनी धाव घेत निदर्शने केली. शाळेत एक विद्यार्थिनी हल्ल्याच्या पूर्ण तयारीसह पोहोचली होती. चाकू हातात घेत तिने स्वच्छतागृहात एवढय़ा मोठय़ा घटनेला मूर्त रुप दिले तरीही शाळेच्या प्रशासनाला त्याचा सुगावा लागलेला नाही. शाळा परिसरात विद्यार्थिनी चाकू कशी घेऊन आली? शाळा प्रशासनाची कोणतीही जबाबदारी नाही का असे प्रश्न उपस्थित करत आता आमच्या मुलांची चिंता वाटू लागल्याचे या पालकांनी म्हटले.

आरोपी विद्यार्थिनी

पोलिसांनी घटनास्थळानजीकच्या कॅमेऱयांच्या चित्रणात स्पष्टपणे काहीही आढळले नाही. परंतु पोलिसांनी उर्वरित चित्रण तपासले असता हल्लेखोरासारखा वेष असणारी एक विद्यार्थिनी दिसून आली. त्या आधारावर तिचे रेखाचित्र तयार करण्यात आले. रेखाचित्र आणि चित्रण दोन्हीही जखमी विद्यार्थ्याला दाखविण्यात आले असता त्याने तिला ओळखले. आरोपी विद्यार्थिनी आठवीच्या इयत्तेतील असल्याचे समजते.

 

Related posts: