|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राममंदिर होणारच : मोहन भागवत

राममंदिर होणारच : मोहन भागवत 

पंढरपूर / प्रतिनिधी :

अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे, ही लोकांची इच्छा आहे. याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहेत. कायद्याच्या दृष्टीने हिंदुत्वाची बाजू भक्कम आहे. त्यामुळे राम मंदिर होणारच, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. पंढरपूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील हिंदु धर्माच्या विविध सांप्रदायिक मंडळींचा ‘संतसंगम’ हा कार्यक्रम सिंहगड महाविद्यालयामधे आयोजित केला होता. यावेळी ते बोलले. याप्रसंगी साधारणपणे 350 विविध हिंदुत्ववादी सांप्रदायातील संत, महंत उपस्थित होते.

यावेळी संतसंगमाच्या दुसऱया सत्रामध्ये भागवत म्हणाले, राम मंदिर हा आस्थेचा विषय आहे. आणि तो होणारच. त्यामुळे काळजी करण्याचे कुठलेच कारण नाही. हिंदु धर्म हा पुरातन आहे. अनेक परकियांची यामध्ये आक्रमणे झाली. मात्र तरी देखिल कुठल्याही प्रकारे हिंदु धर्माला तडा गेला नाही. सध्या जातीभेदांचे जरी जाळे असले. तरी देखिल हिंदुधर्म अभेद्य राहणार आहे. त्यामुळे निश्चितच अयोध्येमध्ये हिंदुधर्माच्या इच्छेनुसार राम मंदिर होणारच, असे देखिल ते म्हणाले.

विविध महाराज मंडळी यांनी सध्या हिंदु धर्मातील विविध प्रांत तसेच आपल्या परिसरामधे जातीनिर्मुलनासाठी काम करणे गरजेचे आहे. यासाठी धर्मप्रचार तसेच वंचित घटकांना न्याय देण्याचा देखिल प्रयत्न करणे गरजेचे असल्यांचे ते यावेळी म्हणाले. तसेच सध्या विविध ठिकाणी जातीय लढाया होत आहे. या लढाया केवळ काही लोकांच्या स्वार्थापोटी आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये धर्माचा प्रचार करताना जातीभेद निर्मुलन सर्वस्वी करणे गरजेचे असल्यांचे देखिल ते म्हणाले.

जातिभेद निर्मुलनासाठी जिल्हयावर महाराज मंडळी तसेच संत महंतांनी काम करणे गरजेचे आहे. याकरिताच आजच्या संतसंगमामध्ये प्रत्येक जिल्हयातील महाराज मंडळी यांना एकत्र करून. त्यांच्या परिसरातील जातीभेदांबाबत नक्की काय करता येउ शकते. याबबात देखिल मार्गदर्शन करण्यात आले.

Related posts: