|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ताबा सुटलेल्या कंटेनरने तीन वाहनांना चिरडले

ताबा सुटलेल्या कंटेनरने तीन वाहनांना चिरडले 

कुवारबाव बाजरपेठेत भीषण अपघात

महावितरण अधिकाऱयाससह कर्मचारी जखमी

केरळमधील कंटेनर चालकाला अटक

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव बाजारपेठेत शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कंटेरने दुचाकीसह तीन वाहनांना चिरडल्याची खळबळजन घटना घडली. सकाळी 10 च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातत दुचाकीवरून प्रवास करणारे महावितरणचे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े याप्रकरणी कंटेरचालक निषाद अब्दुल रहेमान मडती (ऱा केरळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली आह़े

महावितरणचे सहाय्यक मुख्य अभियंता वैभव महाडिक व कर्मचारी शरद गंगाराम मोहिते (55, ऱा खेडशी बौद्धवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत. या दोघांनाही शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े मात्र दान्ही जखमींच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने अधीक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आह़े

अपघाताबाबत अधिक माहित अशी की, निषाद अब्दुल रहेमान मडती हा आपल्या ताब्यातील कंटेनर (केएल 42 ई 3033) घेवून केरळ ते रत्नागिरी असा प्रवास करत होत़ा कुवारबाव बाजारपेठेतील शिवसेना शाखेजवळ आल्यानंतर त्याचा कंटेनरवरील ताबा सुटला. नियंत्रण हरवलेल्या कंटेनरने समोर असलेला छोटा हत्ती (एमएच 08 डब्लू 5469) ऍक्टिवा व झायलो कार(एमएच 08 झेड 2275 ) या वाहनांना जोरदार धडक दिल़ी दुचाकीला दिलेली धकड इतकी भीषण होती की दुचाकी कंटेनरच्या पुढच्या बाजुने आत घुसली. या अपातात दुचाकीवर असलेले महावितरणे दोघे कर्मचारी गंभीर जखमी झाल़े तर छोटा हत्ती व झायलो कारचेही मोठे नुकसान झाले आह़े

सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठया प्रमाणावर कोंडी झाली होत़ी मात्र पोलीस व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आल़ी या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल झेरे हे अधिक तपास करत आहेत़