|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी

‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी 

प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील प्रसिद्ध ‘सिद्धिविनायक मंदिर’ न्यासच्यावतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी †िजह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी एक कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱयांकडे विश्वस्तांमार्फत देण्यात येईल, अशी माहिती न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. यापूर्वी ठाणे जिह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी रुपयांचा धनादेश न्यासच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्हय़ांना प्रत्येकी एक कोटी देण्यात येणार असल्याचे न्यासच्यावतीने सांगण्यात आले होते.

जलयुक्त शिवारसाठी जिह्यात 44 गावे निवडण्यात आली असून सुमारे 40 कोटींचा आराखडा आहे. श्रीसिद्धीविनायक न्यासाने तीन टप्प्यात अनुक्रमे 1 कोटी, 19 लाख 11 हजार आणि 1 कोटी असे राज्यातील 34 जिह्यांना 74 कोटी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले असून 67 कोटी 50 लाख रुपयांचे वाटप 34 जिह्यांना केले. जिह्यातील शेतीच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीच्या विकासांशी संबंधित योजनांसाठी आमचे योगदान देत आलो असल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले. तसेच सामाजिक जाणीवेतून मग ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा जलयुक्तसारखे अभियान असो, सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून श्रीसिद्धीविनायक न्यासच्यावतीने साडेचार कोटी रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना देण्यात आली असल्याचेही न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.

 

 

Related posts: