|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » स्मार्टसिटीच्या 9 शहरांची यादी जाहीर

स्मार्टसिटीच्या 9 शहरांची यादी जाहीर 

नवी दिल्ली 

: मोदी सरकारकडून शुक्रवारी स्मार्टसिटीमधील 9 शहरांची नावे घोषित करण्यात आली. आता देशातील स्मार्टसिटींची संख्या 99 वर पोहोचली आहे. गृहप्रकल्प आणि नागरी विकास मंत्रालयाकडे 15 शहरांची यादी आली होती आणि यामधून 9 शहरांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशातील 3 आणि बिहार, अरुणाचल प्रदेशातील प्रत्येकी एका शहराचा समावेश आहे. या 9 स्मार्टसिटींच्या विकासासाठी सरकारकडून 12,834 कोटी रुपये देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील बरेली, मुरादाबाद, सहारनपूर, बिहारमधील बिहार शरीफ, अरुणाचल प्रदेशातील इटानगर, तामिळनाडुतील सिल्वासा आणि एरोड, लक्षद्वीपवरील कवारती, दमन दीवमधील दीव यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मेघालयाची राजधानी शिलाँगच्याही प्रस्तावावर विचार करण्यात येत आहे. या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशातील मीरत, गाझियाबाद, रामपूर, रायबरेली यांचा समावेश झालेला नाही. शिलाँगबाबत पुढील तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल. निवड झालेल्या 9 शहरांतील 409 प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 61 टक्के निधी देण्यात येईल. या संपूर्ण योजनेसाठी सरकारकडून 2.03 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

 

Related posts: