|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » घरकुल प्रदर्शन व्यवसायासाठी हितवर्धक ठरेल !

घरकुल प्रदर्शन व्यवसायासाठी हितवर्धक ठरेल ! 

किरण ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास : तरुण भारत घरकुल 2018 प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यातील ग्राहकांसाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उपयुक्त सामग्रीच्या व्यापारासाठी मोठा वाव आहे. त्याचप्रमाणे घरकुलसारख्या प्रदर्शनांचे माध्यम सर्वांसाठी हितवर्धक ठरेल, असा विश्वास ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक व समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी व्यक्त केला.

तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या सहकार्याने व मुख्य प्रायोजक विशाल इन्फ्राबिल्ड, सहप्रायोजक  एआरके एन्टरप्रायझेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तरुण भारत घरकुल 2018’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी, विशाल इन्फ्राबिल्डचे चेअरमन विजय पाटील, एआरके एन्टरप्रायझेसचे संचालक अक्षय कुलकर्णी, रोटरीचे उपप्रांतपाल सुजय शहा, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष डॉ. राहुल साठे, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर, इव्हेंट चेअरमन अरविंद खडबडी व राजेशकुमार तळेगाव उपस्थित होते.

आठव्यांदा ग्राहकांच्या भेटीला

तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या त्रिवेणी संगमातून घरकुल प्रदर्शन आठव्यांदा ग्राहकांच्या भेटीला येत आहे. रोटरीसारखी सामाजिक संघटना सामाजिक हेतूने या प्रदर्शनात सहभागी होत आहे. रोटरीने पोलिओमुक्त जगासाठी मोठे काम केले आहे. त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असल्याचे किरण ठाकुर यांनी सांगितले.

यावेळी बोलताना रोटरीचे प्रांतपाल आनंद कुलकर्णी म्हणाले, निःस्वार्थी सेवेमुळेच घरकुल प्रदर्शन दिवसेंदिवस अधिक प्रतिसाद मिळवित आहे. ‘घरकुलासाठी सर्वकाही एका छताखाली’ असे ब्रिद घेऊन सुरू झालेले हे प्रदर्शन गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात नाव कमवीत आहे. धागा ज्याप्रमाणे एकमेकांशी जुळलेला असतो त्याप्रमाणे या तिन्ही संस्था एकमेकाशी जुळल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय मनोहर वाटवे, डी. बी. पाटील, विनय बेहरे व महेश अनगोळकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष डॉ. राहुल साठे यांनी तुळशी वृंदावन देऊन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. बी. पाटील व सचिन कुलगोड यांनी केले. इव्हेंट चेअरमन राजेशकुमार तळेगाव यांनी आभार मानले. यावेळी तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू, सीएमओ उदय खाडीलकर, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे उमेश सरनोबत, अजय पुजार, आनंद कोहळ्ळी, विजय कामकर, महेश हेब्बाळे, अजय पटेल, बसवराज जे. एच., राजेंद्र शेडबाळ, संजीव हंपण्णावर, संग्राम पाटील, रमेश तुपची, सावंत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे, अरुण कामुले, के. व्ही. संजय, प्रसाद कट्टी, सोमनाथ कुडचीकर, अशोक पाटील, हेमेंद्र पोरवाल, डी. एस. अष्टेकर, शिरीष मुतालिक देसाई, डॉ. वर्षा साठे, डॉ. राजश्री कुलकर्णी, सुमती मुतालिक देसाई, उमेश रामगुरवाडी, चंद्रकांत राजमाने, सुनील मंडोळकर, महेंद्र देशपांडे, तरुण भारतचे अरुण दैवज्ञ, संदीप जोग, सोहन, पाटील, निरंजन पाटील, सुहास देशपांडे, विनय पाटील, कलमेश हन्नूरकर यांच्यासह इतर मान्यवर व स्टॉलधारक उपस्थित होते.

  प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल

तरुण भारत घरकुल-2018 या प्रदर्शनात 100 हून अधिक स्टॉल आहेत. गृह निर्माण, बांधकाम साहित्य, अंतर्गत सजावट व गृहनिर्माण प्रकल्पाच्या स्टॉलची संख्या अधिक असून, याचबरोबर गृहोपयोगी साहित्य व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील आहेत. हे प्रदर्शन दि. 20 व 22 रोजी दुपारी 3 ते रात्री 9.30 आणि 21 व 23 रोजी सकाळी 10 ते रात्री 9.30 या काळात रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे खुले राहणार आहे

Related posts: