|Friday, January 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशि भविष्य

राशि भविष्य 

रवि. 21 ते 27 जानेवारी 2018

मेष

मकरेत बुध प्रवेश व चंद्र, गुरु त्रिकोणयोग होत आहे. श्री गणेश जयंतीच्या दिवशी तुमच्या सर्व कामात यश मिळेल. गणेश उपासना मनाप्रमाणे करू शकाल. राजकीय- सामाजिक कार्यात मान सन्मानाचा योग येईल. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यांच्या गरजेला तुम्ही मदत केल्यास लोकप्रियेत वाढ होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. सोमवार, मंगळवार प्रवासात घाई करू नका. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. संसारातील वाद मिटेल.


वृषभ

जिद्दीने कोणतेही कठीण काम पूर्ण करण्यात यश मिळेल. सहनशीलता ठेवा. कष्ट करण्याची तयारी तुमच्या क्षेत्रात तुम्ही ठेवा. मकरेत बुध प्रवेश व सूर्यचंद्र लाभयोग होत आहे. धंद्यात सावधपणे बोला. राजकीय- सामाजिक कार्यातील चुका सुधारता येतील. वरि÷ांना खूष ठेवता येईल. नोकरीतील कामे बुधवार, गुरुवार वाढतील. संसारातील प्रश्न समजूतदारपणे सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.


मिथुन

मकरेत बुध प्रवेश व चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. तुमच्या क्षेत्रात काम करताना दुसऱयांचे विचार कमी लेखून चालणार नाही. राजकीय- सामाजिक कार्यात तडजोड करण्याची वेळ शनिवारी येऊ शकते. वरि÷ांना उद्धटपणे बोलणे घातक ठरेल. धंद्यात गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. संसारात किरकोळ वाद होईल. वृद्ध व्यक्तींची सेवा करावी लागेल. अभ्यासात आळस नको.


कर्क

मकरेत बुध प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. रविवार धंद्यात वाद होण्याची शक्मयता आहे. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. योजनांना लवकर पूर्ण करण्याची जिद्द ठेवा. संसारात संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. नोकरीचा प्रश्न सोडवता येईल. विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक मिळेल. नवीन ओळख होईल.


सिंह

चंद्र, गुरु त्रिकोणयोग व मकर राशीत बुधाचे राश्यांतर होत आहे. सोमवार, मंगळवार मनावर दडपण येईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरि÷ांची मर्जी राखणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय- सामाजिक कार्यात तणाव होईल. लोकांचे सहाय्य व लोकप्रियता कमी होण्याची भीती निर्माण होईल. गुरु ग्रहाची साथ आहे. अहंकार न ठेवता काम करा. समाज कार्याचा वेग वाढवा. दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.


कन्या

जुने सहकारी व मित्र यांना जवळ करण्याची संधी सोडू नका. तुमचा लोकांचा संग्रह कमी होऊ देऊ नका. मकरेत बुध व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे.राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्या. धंद्यात अडचणी येऊ शकतात. व्यसनावर भर देऊ नका. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कुटुंबात शुभकार्याचे ठरेल. दूरच्या प्रवासाच्या बेत ठरवाल. विद्यार्थी वर्गाला चांगले यश मिळेल. वाटाघाटीत यश मिळवता येईल.


तुळ

तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळाली तरी आळस करून चालणार नाही. अडचणीवर मात करण्याची जिद्द ठेवा. मकरेत बुध प्रवेश व चंद्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्याला व्यापक स्वरुप देता येईल. सोमवार, मंगळवार राजकीय- सामाजिक कार्यात मनाची द्विधा अवस्था होईल. सहकारी व नेते यांच्या विचारांना कशाप्रकारे साथ द्यावयाची असा संभ्रम होईल. वरि÷ांना दुखवता येणार नाही. मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल.


वृश्चिक

वृश्चिक राशीला साडेसातीचे शेवटचे पर्वं सुरू आहे. मकरेत बुध व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तेथे मेहनत घ्यावी लागेल. बुधवार, गुरुवार रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध रहा. धंद्यात प्रगती करू शकाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रति÷ा वाढवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळू शकेल. तरीही स्वत: जास्त कष्ट घ्या. शिक्षणात आळस नको. चांगली संगत मुला-मुलींनी ठेवावी.


धनु

मकरेत बुध व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. या सप्ताहात तुमचे सर्वच अंदाज बरोबर  येतील. संसारातील, नोकरीतील, धंद्यातील, ताणतणाव कमी होईल. तुमच्या मनाप्रमाणे सर्वच ठिकाणी प्रगती करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात उत्साहवर्धक वातावरण राहील. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. संततीप्राप्तीचा योग आहे. प्रयत्न करा. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल व आर्थिक लाभ मिळेल.


मकर

बुधाचे राश्यांतर व्यवसायात फायदा करून देणार आहे. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन युक्ती घडवून बाजी मारू शकाल. मानसिक शारीरिक त्रास कमी होईल. शेतीच्या कामात प्रगती संभवते. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढणार आहे. नोकरीत नवीन संधी येण्याची शक्मयता आहे. बुधवार, गुरुवार मनाची थोडी चलबिचल होईल. निर्णय घेताना गोंधळ होईल. घरातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. जीवनसाथीबरोबर वेळ घालवता येईल. विद्यार्थीवर्गाने कष्ट घेतले तर शिखर गाठू शकतील.


कुंभ

बुधाचे राश्यांतर कामात अडथळे निर्माण करणार आहे. वेळेवर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ठोस आश्वासने देऊ नका. पूर्ण करणे थोडे कठीण जाणार आहे. आठवडय़ाची सुरुवात चांगली असणार आहे. प्रेमप्रकरणात यश संभवते. प्रवासाचे बेत आखले जातील. नाटय़ चित्रपट क्षेत्रात नवीन कामे मिळतील. पण कामाचे कौतुक होईलच, याची अपेक्षा ठेऊ नका. शुक्रवार, शनिवार प्रकृतीची थोडी काळजी घ्या. शेतीच्या कामात जास्त लक्ष द्यावे लागेल.


मीन

या आठवडय़ात रेंगाळत पडलेल्या कामांना गती मिळणार आहे. प्रिय क्यक्तींच्या भेटीगाठी संभवतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रुपक्षाच्या कारवाया उघडकीस आणू शकाल. लोकांमध्ये आपले नाव होणार आहे. आर्थिक फायदा संभवतो. नोकरीत शक्मयतो बदल करू नका. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात जास्त लक्ष द्यावे. जुने मित्र भेटतील. जागेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. विचारांना चालना मिळेल.

Related posts: