|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नटसम्राटनंतर वेगळी भूमिका मिळाली

नटसम्राटनंतर वेगळी भूमिका मिळाली 

प्रतिनिधी, मुंबई

नटसम्राट नंतर, काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पाहत होतो, एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे. मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याच्या हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. ‘आपला मानूस’ या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी ते बोलत होते.

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स प्रस्तुत व अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरला आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत असून याच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष चांगलेच आकर्षित केले आहे. नाना पाटेकर, सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला.

या ट्रेलरमध्ये शहरात राहणाऱया आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱया राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका साकारल्या आहेत अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी. तसेच यात वडिलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुद्धा दाखविलेली आहे. वडिलांच्या अनपेक्षित मफत्यूमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाचा प्रवेश होतो. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग बदलते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबाविषयीच्या श्रद्धांवर प्रश्न उभे राहतात. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्सचे सीओओ अजित अंधारे म्हणाले, आमचा 2018 मधील पहिला मराठी सिनेमा आपला मानूस सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. एक असा सिनेमा ज्यातून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि वेगळय़ा कथा असलेले सिनेमे देण्याचा आमचा हेतू प्रतिबिंबीत होत आहे.

वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी व कलर्स मराठीचे व्यवसाय प्रमुख निखिल साने म्हणाले, ‘मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्यत: वैविध्यपूर्ण कथा हाताळण्याचा प्रयत्न केला आहे ज्या आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे, साहित्याचे आणि समाजाचे प्रतिबिंब दर्शवतात. सर्वात महत्वाचे म्हणजे या सिनेमांना मराठी प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि तो बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. सशक्त कथानक आणि उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘आपला मानूस’ हा सिनेमा आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे. मी आशा करतो की, ‘आपला मानूस’ हा सिनेमा 2018 मधील सर्वात यशस्वी सिनेमा ठरेल. ‘आपला मानूस’ 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related posts: