|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कृष्णा नदीकाठी मगरीचे दर्शन

कृष्णा नदीकाठी मगरीचे दर्शन 

 

वार्ताहर/ उदगाव

उदगाव-अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीकाठी असणाऱया परिसरात आठ ते नऊ फुटाची मगर ग्रामस्थांनी पाहिल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या मगरीला वनखात्याने तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.

गेले तीन दिवस उदगाव ते अंकली दरम्यान असलेल्या रेल्वे पूल ते नवीन अंकली रस्त्यादरम्यान ही आठ ते नऊ फुटाची मगर अनेकांना आढळली. अनेकांनी त्याचे व्हिडीओ चित्रण व फोटो काढले आहेत. ही बातमी सोशल मिडीयातून तात्काळ गावात पसरल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात सकाळी जयसिंगपूर, उदगाव, अंकली येथील नागरिकांची पोहण्यासाठी मोठी गर्दी असते. यामुळे या नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मगरीस जेरबंद करावे, असे निवेदन उदगाव ग्रामपंचायतीने वनखात्याला दिले आहे.

Related posts: