|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कृष्णा जलवाहीनीची गळती काढण्याचे काम पुर्ण

कृष्णा जलवाहीनीची गळती काढण्याचे काम पुर्ण 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणाऱया कृष्णा योजनेच्या जलवाहीनील दोन दिवसांपुर्वी गळती लागली होती. शनिवारी दुपारी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्षा सौ. सरीता आवळे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देवून पहाणी केली. संध्याकाळपर्यंत गळती काढण्याचे काम पुर्ण होवून पाणी उपसा सुरु झाला आहे.

इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱया मजरेवाडी येथील पाणीउपसा केंद्रातून येणाऱया जलवाहीनीला शिरढोण येथील पंचगंगा नदीपात्राजवळ मोठी गळती लागली होती. यामुळे गेले देन दिवस इचलकरंजीचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. गळती लागलेल्या दिवसापासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्याचे काम सुरु होते. शनिवारी दुपारी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्षा सौ. सरीता आवळे, मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्यासह नगरसेविकांनी प्रत्यक्षग कामाच्या ठिकाणी भेट देवून पहाणी केली व आवश्यक त्या सुचना केल्या. यानंतर संध्याकाळी गळती काढण्याचे काम पुर्ण झाले असुन पाणीउपसा करण्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे.

Related posts: