|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भरदिवसा कारमधून 41 हजार लांबविले

भरदिवसा कारमधून 41 हजार लांबविले 

प्रतिनिधी/ निपाणी

 भरदिवसा स्वीफ्ट कारमधील 41 हजार रुपयांची रक्कम चोरटय़ांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 9.40 च्या सुमारास निपाणी नगरपालिकेसमोर घडली. सदर चोरटे पैशाची बॅग घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

 याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, रामचंद्र शिंगाडी गावडे हे खडकलाटहून निपाणीला कामानिमित्त आले होते. गावडे हे खोत यांच्या स्विफ्ट कार क्र. (एमएच 13 एसी 7663) मधून येथील नगरपालिकेजवळ झेरॉक्स काढण्यासाठी आले. दरम्यान कार पंक्चर झाल्याचे लक्षात येताच खोत यांनी नगरपालिकेसमोर असलेल्या दुकानसमोर पंक्चर काढण्यासाठी कार थांबविली. तर गावडे हे आपल्याकडील कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी नजीकच्या दुकानात थांबले होते. त्यानंतर ते कारजवळ गेले असता त्यांना कारमध्ये असलेली पैशाची बॅग दिसून आली नाही. सदर बॅगेत 41 हजार रुपयांची रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. ही बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 यावेळी त्यांनी पालिका परिसरात बॅगेची शोधाशोध केली. त्यानंतर गावडे यांनी सदर घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरात पाहणी केली. यावेळी पोलिसांनी पालिकेसमोर असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. यामध्ये दोघे चोरटे कारजवळ थांबून बॅग लांबवित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सदर चोरटे बॅग घेऊन थोडय़ा अंतरापर्यंत चालत जाऊन दुचाकीवरुन पसार झाल्याचे फुटेजमध्ये आढळून आले. तर बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दुचाकीवरून तिघे युवक बॅग घेऊन जात असल्याचे स्पष्ट आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी पुढील तपास चालविला आहे. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली असून तत्कालीन फौजदार निंगनगौडा पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

Related posts: