|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबई मॅरेथॉन : इथोपियाचा सॉलोमन विजेता

मुंबई मॅरेथॉन : इथोपियाचा सॉलोमन विजेता 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मोठय़ा उत्साहात पार पडलेल्या  ‘मुंबई मॅरेथॉन’वर इथिओपियाच्या स्पर्धकांनी ठसा उमटवला. पुरुष गटात सॉलोमन डेक्सिसानं प्रथम क्रमांक पटकावला तर महिला गटात इथिओपियाच्याच अमानी गोबेना हिने विजेतेपद पटकावले.

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहा प्रकारच्या रनचा समावेश असून पूर्ण मॅरेथॉन ही ४२.१९५ किमीची असून यामध्ये ६,९५५ धावपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये देशविदेशातील धावपटूंचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे यंदाही या रनमध्ये इथोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व आहे. हाफ मॅरेथॉन २१.०९७ किमीची असून यात १४,९५० धावपटू सहभागी झाले आहेत. टाइम रन मॅरेथॉन १० किमीची असून यात १, ६५२ स्पर्धक सहभागी झाले आहेत. ड्रीमरनसाठीचे अंतर हे ६.६ किमीचे असून यात १८,५०० मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे. सिनिअर सिटिझन रन ४.६ किमीची असून यात १,१३० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला आहे. चॅम्पिअन विथ डिसेब्लीटी रन २.४ किमीची असून यात १,२२० अपंग स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

हौशी धावपटूंच्या मॅरेथॉन (अमॅच्युअर फुल मॅरेथॉन) ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. तर एलिट मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील नामवंत धावपटूही सहभागी झाले. या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती होत्या. अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली.

 

Related posts: