|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » 12 वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा

12 वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा 

ऑनलाईन टीम / चंदीगड :

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी हरयाणा सरकारने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेशपाठोपाठ आता हरयाणातही बारा वर्षापर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱयास फाशीची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. या शिक्षेची तरतूद असणारे विधेयक लवकरच विधानसभेत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांत हरयाणामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने मनोहर लाल खट्टर सरकारवर टीका होऊ लागल्याने खट्टर यांनी हा निर्णय घेतला आहे. बलात्कारासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱयांना फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे, असे खट्टर म्हणाले. याशिवाय बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी फास्ट ट्रक कोर्टची स्थापना करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: