|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » जळगावात पद्मावतचे प्रदर्शन नाही

जळगावात पद्मावतचे प्रदर्शन नाही 

जळगाव/ प्रतिनिधी :

पद्मावत हा वादग्रस्त चित्रपट जळगावात प्रदर्शित न करण्याचा निर्णय येथील चित्रपटगृह चालकांनी रविवारी घेतला.

25 जानेवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होत असला, तरी जळगाव शहरात प्रदर्शित करावयाचा की नाही, याबाबत येथील चित्रपटगृहचालकांची आज एक बैठक झाली. शुक्रवारी राजपूत समाजाचा एक विशाल मोर्चा पद्मावती सन्मानार्थ निघाला होता. या वेळी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती करण्यात आली. तसेच हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील चित्रपट प्रदर्शनास विरोध केला आहे. यावर आजच्या बैठकीत विचार करण्यात आला आणि अखेर हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय चित्रपटगृहचालकांनी घेतला आहे. त्यामुळे राज्यात अन्यत्र पद्मावत प्रदर्शित होत असला, तरी जळगावकर रसिकांना तो पाहता येणार नाही.

Related posts: