|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » केगाव येथील अपघातात बँकेचा अधिकारी ठार

केगाव येथील अपघातात बँकेचा अधिकारी ठार 

प्रतिनिधी/ सोलापूर

आपल्या चारचाकी वाहनातून जाताना समोरील ट्रकला स्वतःहून धडक दिल्याने बँकेचे शाखाधिकारी जागीच ठार झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे दीडच्या सुमारास सोलापूर विद्यापीठाजवळ घडली.

अजित आनंदराव पाटील (वय 35, रा. मोहोळ, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या शाखाधिकाऱयाचे नाव आहे. अजित पाटील हे मोहोळ येथील बँक ऑफ इंडियामध्ये शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. ते काही कामानिमित्त सोलापुरला आले होते. काम संपवून ते पहाटेच्या दीडच्या सुमारास स्कॉर्पिओमधून मोहोळकडे निघाले होते. गाडीत ते एकटेच होते. विद्यापीठाजवळ आल्यानंतर समोर जाणाऱया ट्रकला स्वतःहून जोरात ठोकरले. अपघात इतका भीषण होता की यात गाडीचा समोरचा भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अजित यांच्या डोक्याला व छातीला मार लागून मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. गाडीमध्ये ते एकटेच असल्याने किमान अर्धातास अजित रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

दरम्यान अपघाताचा आवाज ऐकून जमा झालेल्या लोकांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. गाडीत मिळालेल्या कागदपत्राच्या आधारे अपघाताची माहिती नातेवाईकांनी दिली. सर्व नातेवाईक व मित्रपरिवार घटनास्थळी आले. पोलिसांनी ताबडतोब अजित यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविले. परंतु उपचारापूर्वीच अजित पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डोके करीत आहेत.

Related posts: