|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांखळी पालिका क्षेत्रात विविध कामास शुभारंभ

सांखळी पालिका क्षेत्रात विविध कामास शुभारंभ 

प्रतिनिधी/ सांखळी

सांखळी नगरपालीका क्षेत्रातील गेल्या चार वर्षात रखडलेली अनेक विकास कामे सुरू झाली असून नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या अध्यक्षतेखाली विकास कामांचा शुभारंभ होताना दिसत आहे. स्वच्छ शहर,  स्वच्छ गाव व्हावा यासाठीही त्यांनी स्वच्छतेविषयी खास योजना आखल्या आहेत. तसेच भटकी कुत्री नियंत्रणात रहावी यासाठीही उपक्रम राबवत आहेत. गटार, रस्ते, पेवर्स, विहीर स्वच्छता, कचरा नियोजन, मार्केट समस्या, इत्यादी अनेक कामांना चालना देण्यात आली आहे.

 उपलब्ध माहितीनुसार बेताळ मंदिर ते शंकर देसाई घरापर्यंत गटार बांधकाम, बाजारात मासळी शेडचे उद्घाटन, विर्डीत सार्वजनिक विहीरींची दुरूस्ती, स्वच्छता, विर्डी गणेश विसर्जनसाठी रस्ता बांधणी, शाळकरी मुलांसाठी सुका कचरा गोळा करण्याचा उपक्रम. यात 14 शाळांच्या 2000 मुलांनी सहभाग घेतला असून सेंट जॉन विद्यालय पर्यंत कचरा गोळा केल्याची माहिती उपलब्ध आहे. कुत्र्यांची संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा उपक्रम, इत्यादी अनेक कामांचा शुभारंभ झालेला पहायला मिळतो.

 गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या विविध नगरपालीकेच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, उपनगराध्यक्ष रेश्मी देसाई, सदस्य विभा देसाई, रियाज खान, मिलिंद रेळेकर, दामू घाडी, कुंदा माडकर, निशा पोकळे, दयानंद बोर्येकर, इत्यादी अनेकांची उपस्थिती होती.

 निवडणुकीच्या तोंडावर विकास कामाचा फायदा विद्यमान नगर सेवकांना

 गेल्या साडेचार वर्षे सांखळी पालिकेतील अनेक कामांना सरकारने खो घातल्यामुळे तसेच मुख्याधिकारी यांच्या वारंवार बदल्या करण्यामुळे साखळी शहरातील सामान्य नागरिकांची कामे रेंगाळत पडली होती. त्याना आता चालना मिळाली असून सुमारे 22 विकास कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार असल्याचा विश्वास विद्यमान नगरसेवकांना आहे. त्याचा फायदा विद्यमान नगरसेवकांना होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. साखळी विकास मंच बाजी मारतो की भाजप समर्थक हे या निवडणुकीत समोर येईलच मात्र सरकारमुळे सांखळीचा विकास कुठे मागे राहिला की येणाऱय काळात सांखळीचा कायापालट होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related posts: