|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » बजेट सर्वांना खुश करणारे नसेल ; मोदींचे संकेत

बजेट सर्वांना खुश करणारे नसेल ; मोदींचे संकेत 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारकडून येत्या 1 फेबुवारीला मांडण्यात येणारे अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारे नसेल.यामध्ये सरकारकडून अर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे.असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले आहेत.

यंदा मांडण्यात येणारे अर्थसंकल्प हे लोकप्रियदेखील नसणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट पेले.सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंडय़ावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या पाच प्रमुख गटांतुन बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. ‘टाईम्स नाऊ’या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मेदींनी याबाबत संकेत दिले आहेत. दरम्यान, यावेळी लोकांना खूर करणाला अर्थ संकल्प असेल का? असा प्रश्न विचाला असता पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांना मोफत गोष्टी आणि सूट हवी असते, ही एक धारणा झाली आहे. या प्रश्नावर त्यांनी असेही सांगितले की, देशाला पुढे नेणे आणि मजबूत करण्याची गरज आहे? की राजकीय संस्कृती-काँग्रेसच्या संस्कृतीचं अनुसरण करायचं आहे?, हे सर्वात आधी ठरवावे लागेल. पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे.  सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत. ही तुमची (मोफत गोष्टींची इच्छा ) कोरी कल्पना आहे. आमच्या सरकारचे निर्णय जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत.