|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » सर्वसमावेशक विकास निर्देशांकात भारताची घसरण

सर्वसमावेशक विकास निर्देशांकात भारताची घसरण 

वृत्तसंस्था/ दावोस

उभारत्या अर्थव्यवस्थांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्वसमावेशक विकास निर्देशांकात भारताचे स्थान घसरत 62 वर आले. या यादीमध्ये चीन 26 तर पाकिस्तान 47 व्या स्थानी आहे. विकसित देशांच्या यादीमध्ये नार्वे अव्वल असून उभारत्या देशांच्या यादीत लिथुआनिया पुन्हा पहिल्या स्थानी आहे असे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमकडून सांगण्यात आले.

क्रमवारीसाठी देशातील जीवनमान, पर्यावरणीय स्थिरता, भविष्यातील पिढय़ांसाठी संरक्षण यांचा विचार करण्यात आला. सर्वसमावेशक विकास आणि वाढीसाठी नवीन मॉडेलचा आधार घेण्यास सांगण्यात आले. गेल्या वर्षाच्या 79 विकसनशील देशांच्या यादीत भारताचे स्थान 60, तर पाकिस्तान 52 आणि चीन 15 व्या स्थानी होता. विकसित देशांच्या यादीमध्ये नॉर्वेनंतर आयर्लंड, लक्समबर्ग, स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश आहे.   उभरत्या अर्थव्यवस्थांच्या यादीत लिथुआनिया, हंगेरी, अजरबायजान, लात्व्हिया आणि पोलंड यांचा समावेश आहे. ब्रिक्स देशांमध्ये रशिया 19, चीन 26, ब्राझील 37, भारत 62 आणि दक्षिण आफ्रिया 69 व्या क्रमांकावर आहे. शेजारील देशांत श्रीलंका 10, बांगलादेश 34 आणि नेपाळ 22 व्या स्थानी आहे.