|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भिमा कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन

भिमा कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन 

खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

प्रतिनिधी/ कोल्हापूर

यंदाचे भिमा कृषी प्रदर्शन मेरीवेदर मैदानावर भरविण्यात येणार असून 26 जानेवारीस सकाळी 11 वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात शेतीसंबधी विविध विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शेतीक्षेत्रात भरीव काम केलेल्या शेतकऱयांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्रदर्शन असून तीन दिवसात राज्यभरातून किमान 5 लाख शेतकरी प्रदर्शनासा भेट देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.

महाडिक म्हणाले, प्रदर्शनात देशविदेशातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. पशुपक्षी दालन, विविध सांस्कृतीक कार्यक्रम, शेतकऱयांना उपयुक्त असे तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. असे सांगत ते म्हणाले, प्रदर्शनात 300 स्टॉल मांडण्यात येणार आहेत. महिलांनी तयार केलेल्या वस्तुता थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भगिरथी महिला संस्थेच्या माध्यमातून 200 महिला बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनास राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करणार आहेत.

उद्घाटन प्रसंगी आमदार हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक, संध्यादेवी कुपेकर, सेईओ कुणाल खेमनार, विभागीय कृषी सहसंचालक महावीर जंगटे, ललीत गांधी, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. तर सांगता व बक्षिसस वितरण कृषी राज्यमंत्री सादभाऊ खोत, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रदर्शनाचा शेतकऱयांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार बैठकीस जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी, रामराजे कुपेकर, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजीत भोसले, तानाजी पवार, डॉ, सुनिल काटकर, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.