|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य पाहिजे :उद्धव ठाकरे

छाती 56 इंचाची असून उपयोग नाही, त्यात शौर्य पाहिजे :उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

छाती 56 इंचाची असून उपयोग नाही त्यात शौर्य असावे लागते, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी नितीश गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचे बोलणे ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचे म्हटले. नौदलात असलेले शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. इतकेच नाही तर सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका.तसेच पतंग उडवण्या ऐवजी जम्मू काश्मीरच्या लाल चौकात तीरंगा फडकावून दाखवा,’अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात हा कार्यक्रम सुरु असल्याने उद्दव ठाकरेंनी त्यांचा उल्लेख करत सरदार वल्लभभाई पटेल नुसते बोलणारे नव्हते. ते असते तर काश्मिर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्न कधीच मिटला असता असे त्यांने यावेळी सांगितले नुसतं घुसू घुसू अशी धमकी देत असतात. गोळय़ा मारणार म्हणतात मग काय लिमलेटच्या गोळय़ा मारणार का ? असा टोला त्यांनी यावेळी लगावला. निवडणुका आल्या की पाकिस्तानची आठवण येते, गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा काय संबंध होता असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

 

दरम्यान हिंदुत्वमध्ये फुट नको म्हणून राज्याबाहेर निवडणूक लढवली नाही मात्र या पुढे शिवसेना हिंदुत्त्वच्या मुद्यावर शिवसेना प्रत्येक राज्यात निवडणुक लढवणार असल्याची घेषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

 

Related posts: