|Sunday, January 20, 2019
You are here: Home » उद्योग » ओएनजीसीला इंडियन ऑईल, गेलमधील हिस्सा विक्रीस मंजुरी

ओएनजीसीला इंडियन ऑईल, गेलमधील हिस्सा विक्रीस मंजुरी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एचपीसीएलमधील सरकारी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी इंडियन ऑईल आणि गेल इंडियामधील ओएनजीसीला आपला हिस्सा विक्रीस सरकारकडून मंजुरी देण्यात आली. ओएनजीसीने 36,915 कोटी रुपयांना एचपीसीएलमधील हिस्सा खरेदी करणार आहे. ओएनजीसीजवळ इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील 13.77 टक्के हिस्सेदारी असून त्याचे बाजारमूल्य 26,200 कोटी रुपये आहे. गेलमध्ये ओएनजीसीचा हिस्सा 4.86 टक्के असून ते मूल्य 3,847 कोटी रुपये आहे.

जानेवारीच्या सुरुवातीला सरकारने ओएनजीसीला दोन्ही कंपन्यांतील हिस्सेदारी विक्री मंजुरी दिली आहे. ओएनजीसी निर्धारित किमतीला समभागांची विक्री करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे. एचपीसीएलमधील सरकारचा 51.11 टक्के हिस्सा ओएनजीसी खरेदी करणार असून यासाठी 36,915 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या ओएनजीसीकडे 12 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. कंपनीवर सध्या कोणतेही कर्ज नसून आपला दर्जा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ओएनजीसी आपल्याकडील हिस्सा एलआयसीला विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र एलआयसीकडून समभागांची किंमत बाजाराच्या सध्याच्या दरापेक्षा 10 टक्क्याने कमी आकारण्यात आली होती. यानंतर दोन्ही कंपन्यांतील हिस्सा बाजारात मुक्तपणे विक्री करण्याचा निर्णय ओएनजीसीने घेतला.

Related posts: