|Sunday, January 20, 2019
You are here: Home » उद्योग » गुंतवणुकीसाठी भारत अजूनही आकर्षक

गुंतवणुकीसाठी भारत अजूनही आकर्षक 

पाचव्या स्थानी मजल  जपानला टाकले मागे : सरकारच्या सुधारणांमुळे गुंतवणूकदार आशादायी

वृत्तसंस्था / दावोस

गुंतवणुकीसाठी भारतीय बाजारपेठ अजूनही आकर्षक आहे. गुंतवणूक आकर्षित करण्याच्या यादीमध्ये भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षी भारत या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर होता. पीडब्ल्यूसी या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, 2018 वर्षासाठी भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. अव्वल स्थानावर अजूनही अमेरिका कायम आहे.

पीडब्ल्यूसीकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणुकीसाठी 46 टक्के सीईओंनी अमेरिकेला पहिले स्थान दिले. यानंतर चीन (33 टक्के), जर्मनी (20 टक्के), ब्रिटन 15 टक्क्यांसह चौथ्या स्थानी आणि भारत 9 टक्क्यांसह पाचव्या स्थानी आहे. सरकारकडून मजबूत पायाभूत सुधारणा करण्यात आल्याने गेल्या वर्षात भारताची स्थिती सुधारली आहे, असे पीडब्ल्यूसी इंडियाचे प्रमुख श्यामल मुखर्जी यांनी म्हटले.

भारताच्या विकास दर वाढीबाबत अनेक गुंतवणूकदार आशादायी आहेत. सरकारने पायाभूत सुविधा, उत्पादन, कौशल्य विकाससंदर्भातील समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र यानंतरही सायबर सुरक्षा, हवामान बदल यासारख्या नव्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे, असे मुखर्जी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सीईओंना जगभरात व्यवसाय करण्यासाठी वातावरणनिर्मिती होत असताना सामाजिक आणि आर्थिक आव्हाने वाढत आहेत. प्रादेशिक वाद, सायबर संकट, दहशतवाद ही आव्हाने आहेत. 40 टक्के सीईआंsनी प्रादेशिक वाद, सायबर सुरक्षा आणि 41 टक्क्यांनी दहशतवाद सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले.

व्यावसायिक, सरकार, एनजीओ, मीडिया क्षेत्रातील लोकांचा विश्वास गेल्या वर्षाएवढाच दिसून आला.

यी

Related posts: