|Friday, February 22, 2019
You are here: Home » उद्योग » 7 वर्षांत हवाई प्रवाशांत दुप्पट वाढ

7 वर्षांत हवाई प्रवाशांत दुप्पट वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या तीन वर्षात देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत जबरदस्त वाढ नोंदविण्यात आल्याने 2017 मध्ये ही आकडेवारी 10 कोटीवर पोहोचली. गेल्या 36 महिन्यांत विमान कंपन्यांकडून डिस्काऊंट, तेलाच्या घसरलेल्या किमती, अतिरिक्त प्रवाशांची क्षमता वाढल्याचे दिसून आले. 2010 मध्ये देशातील हवाई प्रवाशांची संख्या 5 कोटीवर होती. गेल्या सात वर्षात यामध्ये दुप्पट वाढ नोंदविण्यात आली.

2017 मध्ये एकूण 11.67 कोटी प्रवाशांनी देशात प्रवास केला. 2016 च्या तुलनेत यामध्ये 17.4 टक्क्यांनी वृद्धी नोंदविण्यात आली. 2012 मध्ये प्रवाशांत घसरण झाल्यानंतर 2013 पासून ही संख्या सतत वाढत आहे. ऑक्टोबर 2012 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स बंद, प्रवासभाडे आणि ग्राहक शुल्कात वाढ करण्यात आल्याने 2011 च्या तुलनेत 2012 मध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाली होती. 2015 आणि 2016 मध्ये प्रवाशांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. गेल्या तीन वर्षांत प्रवास भाडय़ात 30 ते 35 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या 40 महिन्यांत प्रवासी संख्येत सलग दोन अंकी वाढ नोंदविण्यात आली आहे.

Related posts: