|Friday, August 17, 2018
You are here: Home » उद्योग » 10 टक्के विकास दराचा पनगारियांना विश्वास

10 टक्के विकास दराचा पनगारियांना विश्वास 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कामगार कायदे आणि भू अधिग्रहण यासारख्या प्रमुख क्षेत्रात सरकारकडून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्यास 10 टक्क्यांपर्यंत विकास दर पोहोचेल असे नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी म्हटले. मोदी सरकारच्या कालावधीत पहिल्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 7.5 टक्क्यांनी झाली. मात्र नोटाबंदी आणि जीएसटीसारख्या प्रमुख सुधारणांना काही काळ दरात घसरण नोंदविण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5 टक्के राहणार असून तो चांगला असल्याचे त्यांनी म्हटले.

सध्या चीनचा विकास दर 6 ते 7 टक्के असून येत्या पाच वर्षांत त्यात घसरण होण्याची शक्यता आहे. भारताने पुन्हा चुका करण्यास प्रारंभ न केल्यास पुढील दोन दशकांपर्यंत देशाचा विकास स्थिर राहण्यास मदत होईल. जगातील पाचवी आर्थिक सत्ता होण्यासाठी भारताची वाटचाल सुरू आहे. येत्या कालावधीत 10 टक्क्यांपर्यंत विकास दर पोहोचेल याबाबत कोणतीही शंका नाही. यासाठी काही क्षेत्रांचे खासगीकरण आणि नागरी सेवांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या देशाची मोठय़ा प्रमाणातील अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी त्या सक्षम नाहीत असे त्यांनी म्हटले.

Related posts: