|Sunday, January 20, 2019
You are here: Home » उद्योग » 2018 मध्ये बेरोजगारी दर 3.5 टक्के

2018 मध्ये बेरोजगारी दर 3.5 टक्के 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू वर्षात बेरोजगारीचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी 3.4 टक्के असणारा अंदाज आता 3.5 टक्क्यांवर पोहोचल्याचे आंतरराष्ट्रीय कर्मचारी संघटना (आयएलओ) म्हटल आहे.

2018 आणि 2019 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण 3.5 टक्क्यांवर पोहोचले. 2016 आणि 2017 मध्येही हे प्रमाण 3.5 टक्केच होते. 2017 च्या अहवालात भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 3.4 टक्क्यांवर पोहोचेल असे म्हणण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांत प्रथमच बेरोजगारीच्या दरात घरसण होईल असे संघटनेकडून म्हणण्यात आले.

संस्थेच्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारांची संख्या 1.86 कोटी आणि 2019 मध्ये 1.89 कोटीवर पोहोचेल. गेल्या 2017 मध्ये हे प्रमाण 1.83 कोटी होते. संघटनेच्या गेल्या वर्षाच्या अहवालानुसार हे प्रमाण 2017 साठी 1.78 कोटी आणि 2018 साठी 1.8 कोटी असे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीमध्ये रोजगाररहित विकास होत असल्याचा आरोप फेटाळला होता. रोजगारनिर्मितीविषयी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात केवळ 70 लाख रोजगार निर्माण झाल्याचे म्हटले होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर 2017, 2018 आणि 2019 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 5.6 वरून 5.5 टक्क्यांवर आल्याचे संघटनेने म्हटले. यापूर्वी 2017 आणि 2018 यासाठी हा अंदाज 5.8 टक्के होता.

Related posts: