|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

31 जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण

बुध. दि.  24 ते 30 जानेवारी 2018

पुढील बुधवारी 31 जानेवारीला ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे. त्यादिवशी सायंकाळी 5.18 वा. ग्रहण सुरू होईल व रात्री 8.42 वा. सुटेल. ग्रहणाचा कालावधी 3 तास 24 मिनिटे राहील. संपूर्ण भारतात हे चंद्रग्रहण दिसेल. आपल्या चंद्रोदयापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काळा हा पुण्यकाल समजावा. बुधवारच्या सूर्योदयापासून ग्रहण मोक्ष कालापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. या काळात भोजन करू नये. आजारी तसेच अशक्त व्यक्ती तसेच गर्भवतींनी सकाळी 11.30 पासूनच वेध पाळावेत. ग्रहण स्पर्श  होताच स्नान करावे. पर्व कालामध्ये देवपूजन, तर्पण, श्राद्ध, जप, होम  व दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे  पुरश्चरण ग्रहण काणत करावे. ग्रहण संपल्यावर स्नान करावे. ग्रहण कालात झोप घेणे वगैरे गोष्टी करू नयेत. ज्या राशीना ग्रहण अशुभ आहे. त्य़ांनी व गर्भवतींनी ग्रहण पाहू नये. पुष्य नक्षत्राचे चतुर्थ चरण व आश्लेषा नक्षत्रावर हे ग्रहण होत आहे. भारतासह संपूर्ण आशिया खंड, अमेरिका, युरोपचा ईशान्येकडील भाग ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पॅसिफिक व हिंदी महासागर या क्षेत्रात हे ग्रहण दिसेल. वृषभ, तूळ, कुंभ, कन्या या राशीना हे ग्रहण शुभ आहे. मिथून, वृश्चिक, मकर, मीन यांना संमिश्र फलदायक व मेष, कर्क, सिंह व धनु या राशीना हे ग्रहण अशुभ आहे. ग्रहण ही नैसर्गिक घटना असली तरी त्याचे परिणाम मात्र अत्यंत घातक असतात. सर्व ज्ञात अज्ञात तृप्त अतृप्त आत्मे या काळात जागृत होत असतात. जर कुंडलीत शापीत योग असतील तर त्यांना ग्रहण काळात फार त्रास होतो. मानसिकदृष्टय़ा कमकुवत तसेच वेडसर व्यक्ती या काळात सैरभैर होऊन विचित्र वर्तन करताना दिसून येतात. सर्वच राशीना त्याचे शुभाशुभ परिणाम  महिन्याभरात दिसून येतील. दि. 1 फेब्रुवारीला करिदिन असून त्याचा प्रभाव दिवसभर राहील. परमेश्वराने कुणावरही अन्याय केलेला नाही. त्याचाच एक भाग म्हणून करिदिन हे अशुभ व आसुरी शक्तीसाठी राखून ठेवलेले आहेत. चांगल्या व वाईट शक्तींना समसमान काळ ठरवून दिलेला आहे. दरवषी असे 40 ते 45 करिदिन येतात. प्रत्येकाचे महत्त्व वेगळे आहे. आश्लेषा नक्षत्रावरील करिदिन हा प्रखर शापित असतो. त्याचे परिणाम त्रासदायक असतात. ब्रह्मांडातील सर्व अनिष्ट व घातकी शक्तींचा वास करिदिनादिवशी पृथ्वीतलासह अंतरीक्षात असतो. त्यामुळे वातावरण सुतकी व अशुद्ध असते. या दिवशी बाधिक ठिकाणी जावू नये. अनोळखी ठिकाणी अथवा तशा व्यक्तींनी काही खाण्यापिण्यास दिल्यास ते स्वीकारू नये. अथवा कुणी दान वगैरे देत असेल तर ते घेवू नये. दान देणाऱयाची सर्व पीडा व संकटे आपल्याकडे येतात. ग्रहण करिदिन व अमावास्येला भविष्य पाहू नये, असे म्हणतात. कारण वरील दिवशी सर्व प्रकारच्या अशुभ शक्ती जागृत असल्याने ज्योतिषाच्या कुंडलीतील  शापीत दोष व प्रश्न विचारणाऱयाचे शापीत दोष एकमेकांना बाधतात  व नंतर ते निस्तरणे फार कठीण होते. वाहन अपघात, चेष्टा मस्करी अथवा मतभेदांना गंभीर वळण लागते. करिदिनादिवशी कोणाच्याही रुपाने बाहेरील पीडा घरी शिरू शकते हे लक्षात ठेवावे. यावेळी सर्व राशींचे भविष्य व ग्रहांचा अंदाज चंद्रग्रहणाला अनुसरुन दिलेला आहे. ग्रहणाच्या मागील आठ दिवस व पुढील 15 दिवस त्याचा प्रभाव राहील.

 

मेष

31 जानेवारीचे खग्रास चंद्रग्रहण सुखस्थानी होत आहे. तुम्हाला काही बाबतीत सावध राहण्यास सुचवित आहे. धनलाभ, प्रवास, कर्जफेड, नोकरी व्यवसायात यश या दृष्टीने चांगले योग. पण वास्तुदोष नातेवाईकांशी वितंडवाद व लिखाणामुळे नको ते प्रसंग येऊ शकतील. कुणाच्याही सांगण्यावरून वास्तुत काही फेरबदल करू नका, तसेच नको ती अडगळ असेल तर ती काढा, सर्व पीडा दूर होतील.


वृषभ

पुढील बुधवारी राशीच्या ईशान्य भागात होणारे चंद्रग्रहण तुम्हाला संमिश्र फळ देणारे आहे. आर्थिक बाबतीत चांगले अनुभव येतील. पण कठीण व नको त्या कामाची जबाबदारी पडेल. शेजारी व नातेवाईकांच्या वागण्यात फरक जाणवेल. त्याचबरोबर हातून निसटलेली एखादी महत्त्वाची संधी पुन्हा मिळण्याचे योग.


मिथुन

धनस्थानी 31 जानेवारीला होणारे चंदग्रहण आर्थिक बाबतीत सावध राहण्यास सुचवित आहे. उधार उसनवार, देणीघेणी, कर्ज वगैरे प्रकरणी सावध राहणे आवश्यक. डोळय़ांची काळजी घ्यावी. वादावादी मध्यस्थी यापासून दूर रहा. महत्त्वाची कागदपत्रे इतरांच्या हाती पडू देऊ नका. कोणतेही क्यवहार पूर्ण तपासून मगच करा.


कर्क

तुमच्या राशीतच होणारे चंद्र ग्रहण मानसिक स्थिती चंचल ठेवील. कोणताही ठाम निर्णय घेणे कठीण होईल. तुम्हाला अत्यंत अशुभ आहे. आरोग्य, मानसिक स्थिती व प्रति÷sवर परिणाम करणारे हे ग्रहण तुम्हाला जरा त्रासदायक ठरेल. त्यासाठी सर्व बाबतीत सावध राहणे तुम्हाला हितावह ठरेल. आर्थिक क्यवहारात घोटाळे होण्याची शक्मयता.


सिंह

31 जानेवारीला बाराव्या स्थानी होत असलेले चंद्रग्रहण अशुभ योगात आहे. पडझड, आर्थिक हानी, बदनामी, प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारे तसेच गुप्त शत्रुपीडा वाढविणारे आहे. सर्व बाबतीत सावध राहिलात तर काहीही त्रास होणार नाही. आर्थिक शारीरिक व कौटुंबिक बाबतीत शुभ अनुभव येतील.


कन्या

31 जानेवारीला लाभात होत असलेले. चंद्र ग्रहण सर्व बाबतीत शुभ फळ देणारे आहे. आर्थिक सुधारणा, मित्र मंडळींचे सहकार्य तसेच प्रदीर्घ काळापासून  रखडलेल्या  कामात उत्तम यश मिळेल. काही गैरसमज असतील तर ते नाहीसे होतील. स्वभावाचा व ओळखीचा गैरफायदा घेण्याचा काहीजण प्रयत्न करतील. यामुळे कुणाच्याही बोलण्यावर एकदम विश्वास ठेवू नका.


तुळ

31 जानेवारीला दशमस्थानी होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला शुभ आहे. वरी÷ मंडळी खूष राहतील. नोकरी व्यवसायात नजर लागण्यासारखे यश मिळेल. पगारवाढ तसेच अपेक्षित ठिकाणी बदली, स्थलांतर, आवडत्या क्षेत्रात कामाची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नतीचे योग. आरोग्यात सुधारणा तसेच पूर्वी झालेले गैरसमज दूर होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.


वृश्चिक

पुढील बुधवारी भाग्यात होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला मध्यम फलदायक आहे. प्रवास भाग्योदय, हरवलेल्या व्यक्ती अथवा वस्तू सापडतील. नोकरीसाठी केलेल्या अर्जाला उत्तम प्रतिसाद मिळेल जर कोठे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतील. कुणाकडे बाँड, कागदपत्रे वगैरे दिला असाल तर ते काढून घेण्याचा प्रयत्न करा.


धनु

तुम्ही कितीही हुषार असला तरी अनवधानाने काही चुका होऊ शकतात. मन शांत ठेवूनच कामे करावी लागतील. 31 जानेवारीला आठव्या स्थानी होणारे चंद्रग्रहण तुम्हाला आरोग्याच्या क्लेशदायक राहील. पडझड, दुरुस्ती करताना नुकसान आर्थिक हानी असे प्रकार घडू शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत काळजीचे प्रसंग.


मकर

 31 जानेवारीला चंद्रग्रहण सातव्या स्थानी होत आहे. खरेदीसाठी नवनव्या खर्चाचे प्रसंग उदभवतील. काही व्यक्तींच्या अती चांगुलपणामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज होतील. त्यामुळे काही योजना अथवा जागा बदलण्याचा प्रसंग येईल. या आठवडय़ात महत्त्वाचे कामे जपून करावीत. कुणाशीही क्यवहार करताना काळजी घातल्यास अधिक चांगले.


कुंभ

31 जानेवारीला…सहाव्या स्थानी होत असलेले चंद्रग्रहण तुम्हाला आर्थिक बाबतीत अत्यंत शुभ आहे. देण्याघेण्यातून निर्माण झालेले प्रसंग तडजोडीतून मिटतील. प्रखर शत्रू असले तर ते थंड पडतील. धनलाभाचे अनेक योग शुभ घटनांची मांदियाळी राहील. वाईटातून चांगले करणारे हे ग्रहण आहे. प्रवास व भागीदारी व्यवसाय असेल तर सांभाळावे लागेल.


मीन

31 जानेवारीला पंचमात होत असलेले खग्रास – चंद्रग्रहण संमिश्र फलदायक आहे. संततीच्या दृष्टीने त्रासदायक पण शत्रुनाशाच्या दृष्टीने चांगले ठरेल. पूर्वजांची एखादी कला शिकला असाल तर त्यातून फायदा होईल. मुलाबाळांच्या बाबतीत चिंतेचे प्रसंग, प्रेम प्रकरणे असतील तर मोठी निराशा पदरी पडेल. धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. तसेच गुप्तशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा.