|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग येथे 26 रोजी ‘वंदूया सैनिका’ कार्यक्रम

दोडामार्ग येथे 26 रोजी ‘वंदूया सैनिका’ कार्यक्रम 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यात अनेक माजी सैनिक आहेत. त्यांचे देशासाठी असणारे कार्य वंदनीय असून त्यासाठी प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी रोजी ‘भारत माता की जय’ संघटनेच्यावतीने ‘वंदूया सैनिका’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गावडे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, खरे तर सैनिकांच्या सीमेवरील अफाट कार्यामुळे आम्ही आरामी जीवन जगत आहोत. दोडामार्ग तालुक्यातील हजारो सैनिकांनी देशासाठी कार्य केले. काहीजण लढता लढता अमर झाले. त्यांच्या प्रती कृतज्ञतेच्या भावनेतून या शूर वीर भारत मातेच्या पुत्रांचा दोडामार्ग येथे प्रजासत्ताकदिनी गौरव सभारंभ आयोजित केला आहे. दुपारी 2 वाजल्यापासून सैनिकांचे एकत्रिकरण, ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पदयत्रा, श्रद्धांजली, देशगीत गायन, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सुभाष वेलींगकर यांचे मार्गदर्शन, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांचा व माजी सैनिक यांचा सत्कार, अनुभव कथन आदी कार्यक्रम असणार आहेत. यावेळी भारत माता की जय संघटनेचे गोवा सरचिटणीस प्रवीण नेसवणकर, गणेश गावडे, दीपक गवस, वैभव रेडकर, मयुर दळवी उपस्थित होते. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या सोहळय़ास उपस्थित राहवे, असे आवाहन ‘भारत माता की जय’ संघटनेचे गणेश गावडे यांनी केले आहे.

Related posts: