|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य

यंत्रमाग कामगारांना मजुरीवाढ देणे अशक्य 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

वस्त्राsद्योगातील अभूतपुर्व मंदी, नोटाबंदी व जीएसटीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे अप्पर कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना जाहीर केलेली मजुरीवाढ देणे यंत्रमागधारकांना अशक्य असल्याचे मंगळवारी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे सर्व यंत्रमाग संघटनांच्या अध्यक्षांनी जाहीर केले आहे. तसेच कोणीही यंत्रमागधारकाने ही मजुरीवाढ देवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

 2014 सालापासून आर्थिक मंदीतून वाटचाल करणारा यंत्रमाग व्यवसाय हा नोटबंदी व जीएसटीमुळे अणखीनच अडचणीत आला आहे. त्यातच इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीची मागणी केली होती. पण सध्या या व्यवसायाची परिस्थिती पाहता आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची मजुरीवाढ देवू नये असे आवाहन करूनही अप्पर कामगार आयुक्त व सहाय्यक कामगार आयुक्तांनी मजुरीवाढीची घोषणा केली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेली मजुरीवाढ देतानाच यंत्रमागधारक मेटाकुटीस येत आहे. कापडास मागणी नाही , अपेक्षीत दर मिळत नाही, गेल्या 3 वर्षात मजूरीने कापड विणणाऱया यंत्रमागधारकास (खर्चीवाल्यास) एका पैशाचीही मजुरीवाढ मिळालेली नाही. पण प्रशासन मात्र चालू वर्षातील व मागील वर्षातील फरकासह यंत्रमाग कामगारांची एकतर्फी मजुरीवाढ जाहीर करत आहे.

  गेल्या दोन ते तीन वर्षापासून यंत्रमागधारक संघटना सरकारकडे  व्याजामध्ये तसेच लाईट बिलामध्ये सवलत मागत आहे. वेगवेगळया आंदोलनानंतर सरकारने व्याजामध्ये 5 टक्के व लाईट बिलामध्ये प्रति युनिट 1 रूपयांची सवलत जाहीर केली आहे. याबाबत मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपात या योजना सुरू करण्याची हमी दिली आहे. पण या सवलती यंत्रमागधारकांच्या पदरात पडत नाहीत. पण प्रशासन मात्र यंत्रमाग कामगारांची अव्यवहार्य मजुरीवाढ जाहीर करून हा व्यवसाय ठप्प करू पाहत आहे. इचलकरंजी केंद्र वगळता अशी दरवर्षी यंत्रमाग कामगारांची मजुरीवाढ इतरत्र कोठेही होत नाही. त्यामुळे इचलकरंजी येथील कापडाचा उत्पादन खर्च तुलनेने वाढला आहे. त्यामुळे इचलकरंजीतील कापडाची मागणी घटलेली आहे. या सर्वांचा विचार केला असता प्रशासनाने जाहीर केलेली मजुरीवाढ देणे यंत्रमागधारकांना अशक्य आहे.

 तरी सर्व यंत्रमागधारकांनी कोणत्याही प्रकारची मजुरीवाढ देवू नये असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, कोल्हापूर जिल्हा पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष दिपक राशिनकर, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्कीरे व साधे पॉवरलुम संघटनेचे संचालक विश्वनाथ मेटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

Related posts: