|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » 69 वा प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी

69 वा प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी 

शाळांपासून ते शासकीय कार्यालयोची तयारी

प्रतिनिधी/ सातारा

प्रजासत्ताक दिनाची शहरात जोरदार तयारी सुरू आहे. शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या परेडची तयारी पोलीस परेड मैदानावर होत आहे. यात एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विविध शाळेचे विद्यार्थी तयारी करत आहेत. काही शाळांत देशभक्तीपर गीतावर नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. लेझिम, झांझ पथकांची तयारी जोरात सुरू आहे. तर शहरात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू केली जात आहे.

69 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील शाळांमध्ये मुलांकडून तयारी करून घेतली जात आहे. यावेळी देशभक्तीपर कविता, गोष्टी, स्वागत, याची पूर्व तयारी केली जात आहे. तर शाळेतील एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून परेडची तयारी करत आहेत. शाळेत देशभक्तीपर गाण्यावर नृत्य करण्यासाठी शाळा सुटल्यावर मुले तयारी करत आहेत. तसेच आपली शाळा स्वच्छ दिसण्यासाठी स्वच्छता केली जात आहे.

पोलिसांची परेड तयारी…

दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रजासत्ताक दिनाची पोलीस जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस परेड गाऊंडवर सकाळी परेडची पूर्व तयारी करत आहेत. यामध्ये सातारा पोलीस आणि होमगार्ड हे संचालन परेडची तयारी करत आहेत. आता पोलिसांबरोबर शाळेतील एनसीसी, आरएसपी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी सुद्धा पोलीस परेड ग्राऊंडवर तयारी करत आहेत.

पालिकेची स्वच्छता मोहीम तेजीत…

प्रजासत्ताक दिन जवळ येत असून शहरात कचऱयाचे प्रमाण कमी दिसावे. यासाठी पालिकेकडून प्रयत्न होत आहेत. यामुळे कचरा उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी पालिकेचे कर्मचारी कचरा उचलताना दिसत आहेत.